8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! लाखो रुपयांचा एरियर मिळणार; पगार कितीने वाढणार?

8th Pay Commission Salary Hike: आठव्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांना एरियर किती रुपयांचा मिळणार हे जाणून घ्या.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

लाखो रुपयांचा एरियर मिळणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार कितीने वाढणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, लवकरच कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे. पगारवाढीसोबतच कर्मचाऱ्यांना एरियरदेखील मिळणार आहे. जानेवारी २०२६ पासूनचा एरियर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा एरियर मिळू शकतो. कोणत्या कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार हे जाणून घ्या.

बेसिक सॅलरी वाढणार (8th Pay Commission Basic Salary Hike)

सरकारने जर फिटमेंट फॅक्टर २.० ते २.५७ केला तर सॅलरी आणि एरियरमध्ये वाढ होणार आहे. दरम्यान, तुमचा पगार किती वाढणार ते जाणून घ्या.

सातवा वेतन आयोग ३१ डिसेंबर रोजी संपला आहे. त्यानंतर आठवा वेतन आयोग लागू होण्यास कमीत कमी एक वर्षांचं अंतर पकडल्यास १२ महिन्यांचा एरियर मिळणार आहे. या हिशोबाने कोणत्या कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार ते जाणून घ्या.

मिळालेल्या माहितीनुसार, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी २०२७ मध्ये लागू होऊ शकतो. त्यामुळे १ जानेवारीपासूनचा एरियर मिळणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना १२ ते २४ महिन्यांचा एरियर मिळणार आहे.

पगार कितीने वाढणार? (8th Pay Commission Salary Hike)

जर फिटमेंट फॅक्टर २.० ठेवला तर लेव्हल १ कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ३६००० रुपये होणार आहे. २.१५ फिटमेंट फॅक्टर असेल तर सॅरी ३८,७०० रुपये होणार आहे. २.५७ असेल तर ४६२६० रुपये होणार आहे.

लेव्हल २ कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर २.० नुसार बेसिक सॅलरी ३९,८०० रुपये, २.१५ नुसार ४२,७८५ रुपये तर २.५७ नुसार ५११४३ रुपये मिळणार आहे.

लेव्हल ३ कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरी २.० नुसार ४३,४०० रुपये मिळणार आहे. २.१५ नुसार ४६६५५ रुपये मिळणार आहे. २.५७ नुसार ५५,७६९ रुपये मिळणार आहे.

लेव्हल ४ कर्मचाऱ्यांना २.० फिटमेंट फॅक्टर असेल तर बेसिक सॅलरी ५१,००० रुपये मिळणार आहे. २.५७ नुसार बेसिक सॅरी ६५५३५ रुपये मिळणार आहे.

एरियर किती मिळणार? (8th Pay Commission Arrears)

जर आपण २० महिन्यांच्या कालावधीचा एरियर पकडला तर कर्मचाऱ्यांना लाखो रुपये मिळणार आहे. लेव्हल १ कर्मचाऱ्यांना २.० फिटमेंट फॅक्टरनुसार ३.६० लाखांचा एरियर मिळू शकतो. लेव्हल २ कर्मचाऱ्यांना ३.९८ लाख रुपयांचा एरियर मिळू शकतो. लेव्हल ३ कर्मचाऱ्यांचा एरियर ४.३४ लाखांपासून ६.८१ लाख रुपये होऊ शकतो, लेव्हल ४ कर्मचाऱ्यांना एरियर ५.१० लाख रुपये मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT