8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आनंदाची बातमी! आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता अधिसूचना मिळाल्यानंतर आठव्या वेतन आयोगात अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट बघत आहेत. जानेवारी २०२५ मध्ये ८ व्या वेतन आयोगाची घोषणा केली होती. त्यानंतर आता आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. वित्त मंत्रालयाने आठव्या वेतन आयोगाबाबत माहिती दिली आहे.

वित्त मंत्रालयाने सांगितले की अधिसूचना जारी झाल्यानंतर समितीची स्थापना केली जाईल. अध्यक्ष आणि सदस्यांनी नियुक्ती केली जाईल. यानंतर पेन्शन आणि वेतनच्या संशोधनासाठी जे Terms of Reference (ToR) लागणार आहे ते निश्चित करण्यात आलेले नाही. या अटींच्या आधारे १ कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात बदल होणार आहे.

लोकसभेत वित्त राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी माहिती दिली आहे. संसदेत प्रश्न विचारण्यात आला की, सरकार २०२६ मध्ये लागू होणार असलेल्या आठव्या वेतन आयोगाची अधिसूचना जारी केली की नाही? यावर सरकारने सांगितले की, आयोगाच्या स्थापनेसाठी संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय आणि वेगवेगळ्या राज्यांकडून इनपुट घेतले जात आहे. अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती अधिसूचनेनंतर केली जाईल.जेव्हा आयोग त्यांच्या शिफारस देईल आणि सरकार त्या स्वीकारतील त्यानंतरच आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार हे ठरवले जाणार आहे.

आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार?

आठव्या वेतन आयोगाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. वित्तीय कंपन्या अॅम्बिट कॅपिटलच्या अहवालात म्हटले आहे की, पगारात किमान १४ आणि कमाल ५४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन वेतन आयोगात कर्मचाऱ्यांसाठी १.८६ आणि २.४६ फिटमेंट फॅक्टरची शिफारस करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT