8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: २०२६ की २०२७; कधी होणार आठवा वेतन आयोग लागू? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

8th Pay Commission Implementation Date: आठव्या वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न सरकारी कर्मचाऱ्यांना पडलेला आहे. याबाबत लोकसभेत माहिती देण्यात आली आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

आठवा वेतन आयोग नेमका कधी लागू होणार?

सरकारने दिली महत्त्वाची माहिती

देशातील कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाची प्रतिक्षा आहे. आठवा वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आठवा वेतन आयोग लागू होण्यास अजून वेळ आहे. मात्र,त्यासाठी काम सुरु झाले आहे. केंद्र सरकारने कर्मचारी, पेन्शनधारका आणि कामगार संघटनांकडून आठव्या वेतन आयोगाबाबत सूचना देण्यास सांगितले होते. यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी तयार करताना या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जाणार आहेत.

दरम्यान, आठवा वेतन आयोग नेमका कधी लागू होणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलेला आहे. कर्मचाऱ्यांना पगारवाढ,महागाई भत्ता आणि पेन्शनवाढ कधी येणार याबाबत सरकारने माहिती दिली आहे.

२०२७ मध्ये वाढणार पगार?(8th Pay Commission Salary Hike in 2027)

लोकसभेत आठव्या वेतन आयोगाबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. याबाबत राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी माहिती दिली आहे. केंद्र सरकारने ३ नोव्हेंबरला आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना केली. या समितीला शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत दिली आहे. पंकज चौधरी यांनी सांगितले की, आयोग १८ महिन्यांच्या आत शिफारसी सादर करायच्या आहे. वेतन, भत्ते, पेन्शन या मुद्द्यांवर शिफरसी सादर कराव्या लागणार आहे.

आठव्या वेतन आयोगासाठी समिती नोव्हेंबर २०२५ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर १८ महिने म्हणजे एप्रिल २०२७ पर्यंत शिफारसींचे काम पूर्ण होईल. त्यानंतर मे २०२८ मध्ये पगारात वाढ होईल, असं अनेकांना वाटतं. आता यावर मंत्री पंकज चौधरी यांनी माहिती दिली आहे.

वेतव आयोगाने शिफारसी सादर केल्यानंतर लगेचच पुढच्या महिन्यापासून पगारवाढ येईल असं होणार नाही. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी सादर केल्या जातील. यानंतर केंद्र सरकार या शिफारसी स्वीकारतील. १८ महिन्यात फक्त शिफारसी सादर करायच्या आहेत. या शिफारसी सरकार मान्य करेल. त्यानंतरच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.

पगारवाढ कधी येणार? (8th Pay Commission Salary Hike)

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी येईल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. २०२६ च्या शेवटची किंवा २०२६-२७ मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते. कर्मचाऱ्यांना एवढ्या महिन्याचा एरियरदेखील दिला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Shocking : वर्षाला ४० लाखाची कमाई करणारा इंजिनियर बनला हैवान; वडिलांसह कुटुंबातील ८ जणांचा घेतला जीव,नेमकं कारण काय?

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू देशात येताच अटक करू; इराणसोबतच्या चर्चेदरम्यान आणखी एका देशाची इस्त्रायलला धमकी

CSK संघाला सर्वात मोठा धक्का; सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज IPL मधून बाहेर

Kukur Tihar Festival: बापरे! येथे चक्क कुत्र्यांची केली जाते पूजा, काय आहे 'कुकुर तिहार' सणामागचा इतिहास?

SCROLL FOR NEXT