8th Pay Commission google
बिझनेस

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी कशी ठरणार? 8व्या वेतन आयोगात कमाल पगाराबाबत 2 मोठे प्रस्ताव

Central Government Employees : आठव्या वेतन आयोगासमोर कर्मचारी संघटनांनी बेसिक सॅलरी, वेतनश्रेणी आणि फिटमेंट फॅक्टरबाबत महत्त्वाचे प्रस्ताव मांडले आहेत. NC-JCM आणि IRTSA यांच्या वेगवेगळ्या मागण्यांमुळे चर्चेला वेग आला आहे.

Sakshi Sunil Jadhav

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सध्या आठव्या वेतन आयोग सध्या केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे. आयोगाचं काम वेगात सुरू असून अनेक शहरांमध्ये कर्मचारी संघटनांशी चर्चा आणि बैठका घेतल्या जात आहेत. यावेळी फक्त फिटमेंट फॅक्टर किंवा पगारवाढ किती होणार यावरच नाही, तर कर्माचाऱ्यांची बेसिक सॅलरी कशी ठरवायची यावरही मोठी चर्चा सुरू झाली आहे.

बेसिक सॅलरी संदर्भात कर्मचारी संघटनांकडून आयोगासमोर वेगवेगळे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. नॅशनल कौन्सिल-जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशीनरी (NC-JCM) स्टाफ साइडने आपल्या निवेदनात किमान आणि कमाल सॅलरीमधले अंतर मर्यादित ठेवण्याची मागणी केली.

त्यांच्या मके, किमान आणि कमाल सॅलरीचं प्रमाण १.१२ पेक्षा जास्त नसलं पाहिजे. यामुळे उत्पन्नातली असमानता कमी होईल. कर्माचारी आणि सरकार एक न्याय आणि सामाजिकदृष्ट्‍या जबाबदार नियोक्ता म्हणून काम करू शकेल. तसेच वेगवेगळ्या वेतनश्रेणींमधला फरकही संतुलित ठेवावा, अशी त्यांची भूमिका आहे.

रेल्वे सीनियर सिटिझन्ल वेल्फेअप सोयायटी या भूमिकेला पाठिंबा देतात. तर दुसरीकडे इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर्स असोसिएशन (IRTSA) ने वेगळी भूमिका मांडली आहे. त्यांच्या मते, कमाल वेतनावर कोणतीही मर्यादा नसावी. तांत्रिक कर्मचाऱ्यांचे काम जास्त जोखमीचं आणि जबाबदारीचे असल्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि जास्त चांगली सॅलरीची रचना असावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Hearing LIVE Updates :अपात्रतेचा निर्णय आधी, मगच पक्ष कोणाचा ते ठरेल, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे पुन्हा आक्रमक; जरांगेंना थेट माफी मागण्याचं आव्हान

मराठा समाजातील मुलींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारेंची मिरवणूक, VIDEO

IPS अधिकाऱ्याच्या आईचा संशयास्पद मृत्यू; तोंडात कपडा कोंबला अन्..;

Fenugreek water: या 5 व्यक्तींनी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं मेथीच्या दाण्याचं पाणी; होतील भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT