Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि विश्वाला यश मिळवण्याचा मार्ग दाखवणारे गुरू मानले जातात.
चाणक्यांना त्यांच्या चाणक्य नितीमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्या स्वभावात कसा बदल केला पाहिजे हे सांगितलं आहे.
रागाच्या भरात लगेच उत्तर देऊ नका. काहीवेळ शांत राहा, खोल श्वास घ्या किंवा त्या परिस्थितीपासून थोडा वेळ दूर राहा.
रागात बोललेले शब्द अनेकदा कायमची जखम करून जातात. त्यामुळे कोणतेही कठोर शब्द बोलण्याआधी ते आवश्यक आहेत का, याचा विचार करा.
प्रत्येक वादामागे काहीतरी कारण असते. समोरच्या व्यक्तीला दोष देण्याऐवजी समस्येचे मूळ समजून घेण्याचा प्रयत्न करा.
रागामुळे निराश होण्याऐवजी त्याचा उपयोग स्वतःला जास्त मेहनत घेण्यासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा म्हणून करा.
रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी मन शांत होऊ द्या.
हा लेख चाणक्य नीतीमध्ये वर्णन केलेल्या पारंपरिक विचारांवर आधारित आहे. यातील माहिती प्रेरणादायी आणि सामान्य मार्गदर्शनाच्या उद्देशाने देण्यात आली आहे.