Sakshi Sunil Jadhav
काही लोकमान्यतेनुसार चोरून आणलेला मनी प्लांट घरात आर्थिक समृद्धी आणतो. पण या विश्वासाला कोणताही वैज्ञानिक किंवा अधिकृत आधार उपलब्ध नाही.
वास्तुशास्त्रात मनी प्लांटला सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पण तो चोरलेलाच असावा, असा कोणताही नियम वास्तुशास्त्रात नमूद नाही.
वास्तुशास्त्रानुसार घरात हिरवी झाडे लावणे शुभ मानले जाते. पण चोरी करून आणलेल्या वस्तू शुभ ठरतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.
एखाद्याची वस्तू परवानगीशिवाय घेणे ही चुकीची कृती मानली जाते. अशा कृतीमुळे सकारात्मक ऊर्जा मिळण्याऐवजी मानसिक अस्वस्थता वाढू शकते.
कोणीतरी प्रेमाने किंवा भेट म्हणून दिलेला मनी प्लांट लावणेही तितकेच शुभ मानले जाते. त्यामुळे चोरी करण्याची कोणतीही गरज नसते.
वास्तुनुसार मनी प्लांट आग्नेय दिशेला लावणे शुभ मानले जाते. झाडाची योग्य देखभाल केल्यास घराचे सौंदर्य आणि सकारात्मक वातावरण वाढते.
सुकलेला किंवा कोमेजलेला मनी प्लांट घरात ठेवणे टाळावे. अशा झाडामुळे नकारात्मकतेची भावना निर्माण होऊ शकते, अशी मान्यता आहे.
घरात कोणतेही झाड लावल्याने आपोआप पैसा मिळत नाही. आर्थिक प्रगतीसाठी मेहनत, योग्य नियोजन आणि बचत महत्त्वाची असते.
मनी प्लांटबाबतच्या शुभ-अशुभ समजुती या पारंपरिक श्रद्धा आणि लोकमान्यतांवर आधारित आहेत. यामागे वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.