8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: १३ एप्रिलला फिटमेंट फॅक्टरबाबत निर्णय होणार? आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बैठक

8th Pay Commission Fitment Factor: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बैठक १३ एप्रिलला होणार आहे. या बैठकीत फिटमेंट फॅक्टरबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बैठक १३ एप्रिलला

फिटमेंट फॅक्टरबाबत निर्णय होण्याची शक्यता

सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे. आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी १३ एप्रिल हा दिवस महत्त्वाचा ठरु शकतो. या दिवशी एक महत्त्वाची बैठक होणार आहे.

१३ एप्रिलला राष्ट्रीय संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या मसुदा समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या शेअर मेमोरँडमला अंतिम स्वरुप दिले जाईल. या बैठकीत फिटमेंट फॅक्टर, भत्ते आणि वेतनबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बैठक खूप महत्त्वाची आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही बैठक खूप महत्त्वाची मानली जाते. यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्तीवेतन, सेवा, अटींबाबत अनेक मुद्दे आयोगासमोर मांडले जातील. याआधी १२ मार्च रोजी बैठक झाली होती.त्यामध्येही अनेक प्रस्तावांवर चर्चा झाली होती.

कर्मचारी संघटनांनी आयोगाला अनेक सूचना केल्या आहे. आयोगाला पत्र लिहून ९ मुद्द्यांचा समावेश करण्याची विनंती केली आहे. याआधी सर्व कर्मचाऱ्यांकडून १८ प्रश्नांची उत्तरे मागितली होती.

सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, निवृत्तीवेतन याचा आढावा घेतला जातो.

फिटमेंट फॅक्टरकडे लक्ष (Fitment Factor)

आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असतो. याच्या आधारावर मूळ पगार ठरवला जातो. कर्मचाऱ्यांची मागणी आहे की, फिटमेंट फॅक्टर ३.२५ किंवा त्यापेक्षा जास्त असावा.महागाईच्या अनुषगांने पगारात पुरेशी वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

महागाई भत्ता आणि विलिनीकरण

सध्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्के आहे. हा महागाई भत्ता ६० टक्क्यांपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता मूळ पगारातच महागाई भत्त्याचा समावेश करण्याची मागणी केली जात आहे.या वेतनासोबत घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युटीमध्येही वाढ होईल. दरम्यान १३ एप्रिलच्या बैठकीनंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम बंगाल निकालाआधीच आला ममता बॅनर्जींचा 'एक्झिट पोल', देशाच्या राजकारणात खळबळ उडवणारा अंदाज

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी वाढ, १ तोळा किती रुपयांनी वाढले? वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

केडीएमसीत पुन्हा भ्रष्टाचार उघड! ४० हजारांची लाच घेताना लिपिक रंगेहाथ पकडला

Maharashtra Day 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनी; नातेवाईक-मित्रांना 'हे' खास मेसेज करुन द्या शुभेच्छा

Ratnagiri Tourism : कोकणातील 'मिनी महाबळेश्वर' पाहिलं का? कडाक्याच्या उन्हात 'येथे' मिळेल थंडावा

SCROLL FOR NEXT