8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य होणार; नवीन सॅलरी स्ट्रक्चर कधी येणार?

8th Pay Commission Dearness Allowance: आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगात सुरुवातीला महागाई भत्ता शून्य होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य होणार

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?

केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली. आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती १८ दिवसांत शिफारसी सादर करणार आहे. त्यानंतर या शिफारशींना केंद्र सरकार सहमती देणार आणि यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाणार आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता हा शून्य होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा ५८ टक्के आहे.

आठव्या वेतन आयोगात महागाई भत्त्यात होणार बदल

आठव्या वेतन आयोगाचा परिणाम हा महागाई भत्त्यावर होतो. मिडिया रिपोर्टनुसार, आठव्या वेतन आयोगात सुरुवातीला महागाई भत्ता शून्य हणार आहे. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर सध्याचा महागाई भत्ता बेसिक सॅलरीत रुपांतरित करण्याची शक्यता आहे.त्यानंतर पुन्हा वर्षभरात दोनदा महागाई भत्ता वाढला जाईल.

कधी लागू होणार नवीन वेतन आयोग लागू? (When Will 8th Pay Commission Implemented)

आठव्या वेतन आयोगाची रिपोर्ट १८ महिन्यात सादर करायची आहे. म्हणजेच २०२७ च्या सुरुवातीला आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो. मिडिया रिपोर्टनुसार, ८ व्या वेतन आयोगात सुरुवातीला महागाई भत्ता शून्य केला जाईल.

फिटमेंट फॅक्टर काय आहे? (What is Fitment Factor)

फिटमेंट फॅक्टरच्या आधारे नवीन वेतन आयोग लागू केला जातो. फिटमेंट फॅक्टर म्हणजेच मागील वेतन आयोगाच्या मूळ पगारात गुणाकार करुन नवीन पगार ठरवला जातो. सध्या फिटमेंट फॅक्टर २.५७ आहे. आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.८६ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१८० किमी वेगाने धावणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन; लोको पायलटच्या केबिनमधून सुवर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Rupali Bhosle Serial: अभिनेत्री रूपाली भोसलेची पहिली मराठी मालिका कोणती होती?

Lasun Shev Recipe: नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत अन् झणझणीत लसूण शेव, सोपी रेसिपी वाचा

Maharashtra Live News Update: मरीन लाईन्स परिसरातील इमारतीला आग

Courtroom Drama: इमरान हाश्मीचा 'हक' पाहायला जायचा प्लॅन करताय? त्याआधी ओटीटीवर पाहा 'हे' कोर्टरूम ड्रामा चित्रपट

SCROLL FOR NEXT