8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट होणार? आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट

8th Pay Commission Salary Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट होऊ शकतो. कर्मचाऱ्यांचा पगार फिटमेंट फॅक्टरनुसार वाढतो.

Siddhi Hande

आठव्या वेतन आयोगात पगार दुप्पट होणार

फिटमेंट फॅक्टर किती असणार?

पगाराचं कॅल्क्युलेशन वाचा

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे परंतु पगारवाढ येण्यास अजून उशिर होणार आहे. दरम्यान, आता या नवीन वेतन आयोगानुसार पगार कितीने वाढणार असा प्रश्न कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पडला आहे. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सध्या सुरु असलेल्या चर्चांनुसार, आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा दुप्पट होऊ शकतो. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? (What is Fitment Factor)

सरकारी कर्मचाऱ्यांचा नवीन पगार काढण्यासाठी एक सूत्र वापरले जाते. त्यांच्या सध्याच्या पगाराला फिटमेंट फॅक्टरने गुणले की नवीन वेतन मिळते. त्यामुळे फिटमेंट फॅक्टर जेवढा जास्त पगारवाढ तेवढी जास्त असणार आहे.

सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ झाला होता. यामुळे मूळ वेतन ७,४४० वरुन थेट १८,००० रुपये झाले होते. कमाल वेतन हे २.५० लाख झाले होते.

आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर (8th Pay Commission Fitment Factor)

आठव्या वेतन आयोगात १.८ ते २.८६ टक्के असू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पगारवाढ कितीने वाढणार हे यावर निश्चित होणार आहे.

पगार दुप्पट होणार

जर फिटमेंट फॅक्टर २.१५गृहित धरला तर पगार कितीने वाढणार ते जाणून घ्या. जर मूळ वेतन १८,००० रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर २.१५ तर १८००० गुणिले २.१५ म्हणजेच ३८,७०० रुपये मूळ वेतन होणार आहे. म्हणजेच मूळ पगार थेट १८००० रुपयांवरुन ३८,७०० होणार आहे. हा पगार दुप्पट होणार आहे.

पेन्शनधारकांनाही फायदा

सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच पेन्शनधारकांनाही याचा फायदा होणार आहे. पेन्शनची रक्कम मूळ वेतनाशी जोडलेली असते. फिटमेंट फॅक्टर वाढल्यास पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. यामुळे खूप फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा! पाण्याची चिंता मिटली, ८ दिवसांत धरणातील पाणीसाठा वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

SCROLL FOR NEXT