8th Pay Commission google
बिझनेस

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठवा वेतन लागू होण्याआधीच मोठी अपडेट समोर, डीए वाढीची शक्यता

DA Hike 2026 : आठवा वेतन आयोग लागू व्हायला अजून बराच वेळ लागणार असला तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै २०२६ मध्ये महागाई भत्त्यात २ ते ३ टक्के वाढ मिळण्याची शक्यता असून लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकतो.

Sakshi Sunil Jadhav

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. सध्या पेन्शनधारकांमध्ये आणि कर्मचार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात आठव्या वेतन आयोगाबद्दलची चर्चा सुरु आहे. आता आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. यामध्ये महागाई भत्ता आणि आठव्या वेतन आयोगाची प्रोग्रेसची घोषणा कधी होणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यातच एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

महागाई भत्त्यात कधी वाढ होणार?

आठवे वेतनाच्या नुकत्याच झालेल्या चर्चेतून ही महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना जुलै २०२६ पासून महागाई भत्त्यात (DA Hike) वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन आणि भत्ता मिळत आहे. वाढत्या महागाईचा विचार करता सरकारकडून जास्तीचा दिलासा मिळू शकतो.

महागाईच्या आकडेवारीमुळे वाढल्या अपेक्षा

केंद्र सरकार वर्षातून दोनदा म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्याची नोंद घेतं. यासाठी ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) आणि बाकीच्या महागाईच्या आकडेवारीची नोंद घेतं. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडीवारीनुसार अन्नधान्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तुंच्या किंमती वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जुलै २०२६ मध्ये DA मध्ये २ ते ३ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सध्या महागाई भत्ता किती आहे?

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या ५८ टक्के महागाई भत्ता मिळतो. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार या वर्षी महागाई भत्त्यात आणखी २ ते ३ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. अशी मागणीही कर्माचारी संघटनेने केली आहे. जर ही वाढ मान्य केली तर लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महिन्याच्या बेसिक सॅलरित वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष सरकारच्या पुढच्या निर्णयाकडे लागलं आहे. पण यासंदर्भात अजुनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT