8th Pay Commission  meta ai
बिझनेस

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगासाठी ४.० फिटमेंट फॅक्टरची मागणी होत असून, तो लागू झाल्यावर १८,००० बेसिक सॅलरीचे गणित ७२,००० होऊ शकते. मात्र अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

सरकारी कर्मचारी आणि वेतन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कर्मचारी संघटनांकडून ३.६१ ते ४.०० फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ४.० फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यावर बेसिक सॅलरीत सर्वात मोठी वाढ होऊ शकते.

सातव्या वेतन आयोगात किती वाढ झाली होती?

सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ७,००० रुपयांवरून १८,००० रुपये करण्यात आली होती. आता आठव्या वेतन आयोगासाठी यापेक्षा जास्त फिटमेंट फॅक्टरची मागणी होत आहे.

४.० फिटमेंट फॅक्टर झाला तर पगार किती होणार?

जर ४.० फिटमेंट फॅक्टर स्वीकारला तर सध्याच्या १८,००० बेसिक सॅलरीच्या तुलनेत गणित केल्यावर रक्कम ७२,००० रुपये होऊ शकते. मात्र ही फक्त मागणीवर आधारित गणना आहे. सरकारने अजून कोणताही फिटमेंट फॅक्टर ठरवलेला नाही.

पेन्शनमध्येही मोठी वाढ होणार

उदाहरणार्थ एखाद्या पेन्शनरची सध्याची बेसिक पेन्शन १५,००० रुपये असेल आणि ४.० च्या गुणकानुसार ती ६०,००० होऊ शकते. मात्र प्रत्यक्ष पेन्शन ठरवचाना आयोगाच्या शिफारशी आणि सरकारचा अंतिम निर्णय महत्त्वाचा असेल.

४.० फिटमेंट फॅक्टरची मागणी कोणी केली?

भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ (BPMS) कडून ४.० फिटमेंट फॅक्टरची मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या मते, यातील १.५८ घटक DA चा प्रभाव एकत्र करण्यासाठी तर उरलेली वाढ उत्पन्नवाढीसाठी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकाचा दौरा; अंबड तालुक्यातील पिकांची पाहणी

Reserve Fuel: पेट्रोलची रिझर्व्ह लाईट लागल्यावर कार किती किलोमीटर दूर जाऊ शकते?

Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! आज सोनं महागलं की स्वस्त झालं? वाचा २४, २२ अन् १८ कॅरेटचा भाव

Dam Water Level: मान्सून परतला अन् मुंबईकरांची धाकधूक वाढली! ७ तलावातील पाणी पातळी घटली; पाहा ताजी आकडेवारी

Pomegranate Benefits : १ कप डाळिंबाचे दाणे खाल्ल्यानं शरीराला काय फायदा होतो? जाणून आश्चर्य वाटेल

SCROLL FOR NEXT