8th Pay Commission meta ai
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! पगार अन् पेन्शनचा नवा प्लॅन समोर, पाहा काय बदलणार?

Government Employees Pension Update: आठव्या वेतन आयोगासमोर पगार आणि पेन्शनसंबंधी विविध मागण्या मांडल्या जात आहेत. OPS, NPS, UPS, किमान पेन्शन आणि आगामी बैठकींबाबत महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्समध्ये पगार आणि पेन्शनबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, जुनी पेन्शन योजना (OPS), नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) आणि युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) यावर कर्मचारी संघटनांकडून विविध मागण्या मांडल्या जात आहेत.

केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली होती. आयोगाला सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. सध्या आयोगाकडून कर्मचारी, पेन्शनर्स, संघटना आणि इतर संबंधित घटकांच्या मागण्या जाणून घेण्याची प्रोसेस सुरू आहे.

OPS पुन्हा लागू करण्याची मागणी

२००४ नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या अंशदायी पेन्शन व्यवस्थेबाबत काही कर्मचारी संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर काही संघटनांनी जुनी परिभाषित लाभाची पेन्शन व्यवस्था म्हणजेच OPS पुन्हा लागू करण्याची मागणी आयोगाकडे केली आहे.

काही संघटनांनी रिटायरमेंटनंतर निश्चित पेन्शन मिळावी, तसेच पेन्शनची आर्थिक सुरक्षा वाढवावी, अशी मागणी केली आहे. काही मागण्यांमध्ये शेवटच्या मूलभूत वेतनाच्या ५० टक्के इतकी गॅरंटीड पेन्शन देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.

₹४५ हजार किमान पेन्शनची मागणी

भारत पेन्शनर्स समाजाकडून किमान पेन्शन ₹४५,००० प्रति महिना करण्याची मागणी करण्यात आल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे. याशिवाय शेवटच्या वेतनाच्या ६७ टक्के पेन्शन आणि कुटुंबीयांना शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के कुटुंब पेन्शन देण्याची मागणीही मांडण्यात आली आहे. मात्र, ४५,००० रुपयांची किमान पेन्शन किंवा OPS लागू करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. या मागण्या सध्या आयोगासमोर मांडण्यात आलेल्या प्रस्तावांचा भाग आहेत.

पुढच्या महत्त्वाच्या बैठका

आयोगाची सल्लामसलत प्रोसेस पुढे सुरू आहे. अधिकृत माहितीनुसार ७ आणि ८ ऑक्टोबर २०२६ रोजी बंगळुरूमध्ये आयोगाचा दौरा होणार आहे. त्यानंतर २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी मुंबईतही आयोगाचा दौरा नियोजित आहे. आता आयोगाच्या अंतिम अहवालात पेन्शन, वेतन, भत्ता आणि OPS-NPS-UPS संदर्भातील कोणत्या शिफारसी केल्या जातात, याकडे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेनेतर्फे अवघ्या १० रुपयांत दिवाळी फराळ साहित्य वाटप

Worst Drinks for Kidney: किडनीला आतून पोखरतात हे 5 ड्रिंक्स; चवीच्या नादात आरोग्याचं नुकसान करू नका

Moong vs Chana Sprouts: मूग की चणा स्प्राउट्स, वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे?

Pune Fort : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला कोणता? पुण्याजवळ लपलाय 'हा' ऐतिहासिक खजिना, दिवाळीच्या सुट्टीत नक्की फिरा

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस, पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्पच; परिवहन विभाग अन् गोकुळच्या दूध विक्रीला फटका

SCROLL FOR NEXT