DA Hike: Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाआधी DA वाढणार का? समोर आली मोठी अपडेट

8th Pay Commission Da Hike Update: आठवा वेतन आयोग लागू होण्यासाठी अजून काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, आठवा वेतन आयोग लागू होईपर्यंत महागाई भत्ता मिळणार का असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलेला आहे.

Siddhi Hande

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?

आठवा वेतन आयोग लागू होईपर्यंत महागाई भत्ता मिळणार का?

सरकारने दिली महत्त्वाची माहिती

केंद्र सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत आहे. आठव्या वेतन आयोगाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अपडेट समोर येत आहे. दरम्यान, याबाबत राज्य वित्त मंत्री पंकज चौधरी यांनी माहिती दिली आहे. आठव्या वेतन आयोगात किती कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार, शिफारसी कधी लागू होणार, याबाबत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, अंतिम शिफारसी ठरल्यानंतर वेतन आयोग कधी लागू होणार याची तारीख सरकार निश्चित करणार आहे. याचसोबत प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर आवश्यक फंडदेखील जारी केला जाईल.

आठव्या वेतन आयोगाआधी महागाई भत्ता मिळणार की नाही? (8th Pay Commission Da Hike)

सध्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता दिला जात आहे. हा महागाई भत्ता आठव्या वेतन आयोगात बदलण्यात येईल. नवीन वेतन आयोग २०२६ पासून लागू होणार आहे. दरम्यान, हा वेतन आयोग प्रत्यक्षरित्या लागू होण्यास उशिर होणार आहे. त्यामुळे तो लागू होईपर्यंत महागाई भत्ता मिळणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे.

महागाई भत्ता (DA Hike) हा आता जसा आहे तसाच राहणार आहे. बेसिक सॅलरीवर महागाई भत्ता ठरवला जातो. वर्षातून दोनदा हा भत्ता लागू केला जातो. दरम्यान, वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्ता जारी केला जातो. याआधीच्या महिन्याच्या CPI बेस्ड महागाई डेटा आधारित महागाई भत्ता ठरवला. त्यानुसारच या कालावधीतदेखील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळेल. दरम्यान, तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता हा मूळ पगारात दिला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Mistakes: वजन कमी करण्यासाठी रोज चालायला जाताय? मग या चुका होणार नाहीत याची घ्या काळजी

Maharashtra Live News Update: अंबादास दानवे यांच्या कॅशबॉम्ब प्रकरणात शेकापची उडी

Tejaswini Lonari Honeymoon Photos: अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची हनिमून ट्रिप, रोमॅन्टिक पहिला फोटो आला समोर

खुशखबर! टोल माफीवर सरकारचा मोठा निर्णय, या वाहनांना सगळीकडेच टोलमाफ

लग्नात हुंडा मिळाला नाही; नवऱ्याचं डोकं फिरलं, बायकोसोबतच्या खासगी क्षणाचे व्हिडिओ केले व्हायरल

SCROLL FOR NEXT