8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? अर्थमंत्री अर्थसंकल्पात करु शकतात मोठी घोषणा

8th Pay Commission Announcement In Budget 2025: बजेटमध्ये आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी घोषणा केली जाऊ शकते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार हे अर्थमंत्री निर्मला सितारामन सांगू शकतात.

Siddhi Hande

उद्या १ फेब्रुवारी रोजी देशाचे अर्थसंकल्प सादर केले जाणार आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक निर्णय होऊ शकतात. दरम्यान, केंद्र सरकारने नुकतीच आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करण्यास सांगितले आहे.दरम्यान, आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. अशातच उद्या १ फेब्रुवारी रोजी आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी घोषणा होऊ शकतात. (8th Pay Commission)

मिडिया रिपोर्टनुसार, आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर १.९२ ते २.०८ च्या मध्ये असू शकतो. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात १०८ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. दरम्यान, सॅलरी स्टारप्रत, महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.बजेटमध्ये याबाबत घोषणा होण्याची अपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांना आहे. (8th Pay Commission News)

आठव्या वेतन आयोगाची समिती स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. आतापर्यंत ७ वेतन आयोग लागू करण्यात आले आहेत. २०१६ मध्ये ७वा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. हा वेतन आयोग २०२६ मध्ये संपणार आहे. दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. त्यामुळे २०२६ मध्ये आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे.

फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्त्यात वाढ

आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होणार आहे. यामध्ये कमीत कमी फिटमेंट फॅक्टर २.८६ होऊ शकतो.जर फिटमेंट फॅक्टर २.०८ झाला तर केंद्रिय कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८००० हून ३७,४४० होऊ शकते. तर पेन्शन ९००० हून १८,७२० होऊ शकते. जर फिटमेंट फॅक्टरमध्ये १८६ टक्के वाढ झाली तर बेसिक सॅलरी ५१,४८० रुपये तर पेन्शन २५,७४० होऊ शकते. ८ व्या वेतन आयोगाबाबत बजेटमध्ये घोषणा होऊ शकते. आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ज्ञानेश कुमार म्हणजे अडाणी कुमार, उद्धव ठाकरेंचा घणाघात; पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांवर हल्लाबोल

Maharashtra News Live Update: विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी भाजपकडून ५ पैकी ३ उमेदवारांची घोषणा

Amla Benefits : रोज फक्त 1 आवळा, शरीरात होतील हे 9 मोठे बदल; केसांपासून त्वचेपर्यंत मिळेल फायदा

Raj Thackeray: महाराष्ट्रात झालेला SIR रद्द करा, राज ठाकरेंची निवडणूक आयोगाविरोधात गर्जना

Pitru Paksha 2026: पितृपक्षात केस कापावेत की नाही? जाणून घ्या काय सांगते धार्मिक मान्यता

SCROLL FOR NEXT