DA Hike Update News SAAM TV
बिझनेस

7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक खूशखबर; पगारात होणार घसघशीत वाढ, कारण काय?

7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबर महिन्यात मोठी खुशखबरी मिळणार आहे. यूनिफाइड पेन्शन स्कीमनंतर आता सरकार महागाई भत्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. सरकारकडून ही घोषणा सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. याआधी मार्च,२०२४ महिन्यात सरकारने महागाई भत्यात ४ टक्क्यांनी वाढ केली होती.

'डियरनेस अलाउन्स'ला महागाई भत्ता देखील म्हटलं जातं. सरकारी आणि गैरसराकारी कर्मचाऱ्यांना ही रक्कम दिली जाते. वाढत्या महागाईच्या अनुषंगाने सरकारकडून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या काही प्रमाणात टक्केवारी दिली जाते. महागाई भत्त्यामध्ये मूळ वेतनासोबत घरभाडे भत्ता देखील जोडला जातो.

केव्हा होणार घोषणा आणि किती वाढ होणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांनी वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे. मार्च २०२४ सरकारने महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केली होती. DA आणि DA (डियरनेस रिलीफ) मध्ये वर्षाला दोन वेळा वाढ होते.

कोव्हिड-१९ काळातील थकबाकी मिळणार?

कोव्हिड काळात महागाई भत्ता देण्यात आला नव्हता. २०२० ते २०२१ सालापर्यंत सरकारने तब्बल १८ महिन्यांचा महागाई भत्ता दिला नव्हता. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याचा विरोध केला होता. यावरून केंद्र सरकारवर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते. दुसरीकडे पावसाळी अधिवेशनात केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांनी महागाई भत्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. 'सरकार महगाई भत्ता आणि डियरनेस रिलीफच्या १८ महिन्यांची थकबाकी देऊ शकत नाही, असं ते म्हणाले होते.

दरम्यान, केंद्र सरकारने मार्च २४ महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केली होती. तसेच सरकारने डियरनेस रिलीफ देखील ४ टक्क्यांनी वाढवला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी सरकार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता ४ टक्क्यांपर्यंत करण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT