Polymer Notes meta ai
बिझनेस

Polymer Notes : १० आणि २० रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १०० कोटी नोटांबाबत संसदेत केली 'ही' घोषणा

RBI Update : १० आणि २० च्या १०० कोटी पॉलिमर नोटांच्या फील्ड ट्रायलला मंजुरी ट्रायलला मंजुरी मिळाली आहे. कागदी नोटा तातडीने बंद होणार नाहीत. पॉलिमर नोटांचे फायदे आणि पुढील प्रोसेस जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

भारतात लवकरच १० आणि २० रुपयांच्या नोटांमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो. केंद्र सरकारने या दोन्ही मूल्यांच्या पॉलिमर बँकनोट्सच्या फील्ड ट्रायलला मंजुरी दिल्याची माहिती संसदेत देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात कागदी नोटांसोबत पॉलिमर नोटाही चलनात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरानुसार, १० आणि २० रुपयांच्या मूल्यांच्या एकूण १०० कोटी पॉलिमर नोटांच्या फील्ड ट्रायलचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ही मंजुरी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या शिफारशीच्या आधारे आणि RBI Act, १९३४ मधले कलम २५ अंतर्गत देण्यात आली आहे.

कागदी नोटा बंद होणार का?

मिळालेल्या माहितीनुसार,कागदी १० आणि २० रुपयांच्या नोटा तातडीने बंद केल्या जाणार नाहीत. पॉलिमर नोटा सध्या कागदी नोटांना पर्याय म्हणून नाही, तर त्यांच्यासोबत चलनात आणल्या जाण्याची शक्यता आहे.

फील्ड ट्रायल यशस्वी झाल्यानंतर या दोन्ही मूल्यांच्या पॉलिमर नोटा नियमितपणे जारी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण सध्या या नोटा नेमक्या कधी चलनात येतील, याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. RBI ने स्पष्ट केलंय की, नोटांच्या छपाईची प्रोसेस अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे.

पॉलिमर नोटांचा फायदा काय?

पॉलिमर नोटा पाणी, धूळ आणि रोजच्या वापरामुळे लगेच खराब होत नाहीत. त्या कागदी नोटांच्या तुलनेत जास्त टिकाऊ असतात आणि सहज फाटतही नाहीत. याशिवाय पॉलिमर शीटवर आधुनिक सुरक्षा फीचर्स बसवणे तुलनेने सोपं असल्यामुळे बनावट नोटांना आळा घालण्यासाठी मदत होऊ शकते.

कागदी नोटा लवकर खराब होत असल्यामुळे त्यांच्या छपाईचा खर्चही मोठा असतो. FY २५ मध्ये आरबीआयने कागदी नोटांच्या छपाईवर ६,३७२.८ कोटी रुपयांचा खर्च केल्याची माहिती देण्यात आली आहे. पण सध्या ही प्रोसेस फक्त फील्ड ट्रायलच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे पॉलिमर नोटा प्रत्यक्ष चलनात येण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Nasik: आदिवासी आयुक्त लीना बनसोड शासनाच्या वतीने निदेवन स्वीकारलं

Rajmachi Fort : एकाच पठारावर दोन बालेकिल्ले! राजमाची किल्ल्याचे 'हे' रहस्य तुम्हाला माहितेय का?

मोदी मंत्रिमंडळात सप्टेंबरमध्ये मोठा फेरबदल? ‘या’ दिग्गजांची धाकधूक वाढली; कोणाला लागणार लॉटरी?

शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! वनपट्टेधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सरकारी योजनांचा मिळणार लाभ

Aavalyacha Juice: महिनाभर प्या आवळ्याचा ज्यूस, १५ दिवसांत दिसेल शरिरात बदल

SCROLL FOR NEXT