Union Budget 2024 Latest News Saam TV
Union Budget 2025 Highlights

Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मांडणार देशाचा अर्थसंकल्प; तुमचा खिसा भरणार की रिकामा होणार?

Budget 2024 News: यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांचा खिसा भरणार की रिकामा होणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.

Satish Daud

Union Budget 2024 Latest News

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सलग सहाव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. लोकसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली असल्याने यंदाचा अर्थसंकल्प हा अंतरिम असणार आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांचा खिसा भरणार की रिकामा होणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2024 News) लोकप्रिय घोषणा टाळल्या जाण्याची शक्यता आहे. तरीदेखील कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सहकार क्षेत्र यामध्ये सरकार काही महत्त्वाच्या घोषणा करणार का? यावर सर्वांच्या नजरा असतील.

त्याचप्रमाणे सरकार मध्यमवर्गीयांना प्राप्तिकतराविषयी आणखी सूट देण्यात येईल का, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेल्यावर्षी निर्मला सीतारमण यांनी सर्वसामान्य लोकांसाठी न्यू इनकम टॅक्समध्ये मोठी सवलत दिली होती.

करदात्यांना ७ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर मुक्त करण्यात आले होते. याशिवाय महिलांसाठी पण सरकारने विशेष घोषणा केली होती. महिलांचा बचतीचा कल पाहता, त्यांच्यासाठी खास योजना आणण्यात आली होती. (Latest Marathi News)

त्याचबरोबर पायाभूत सोयी-सुविधांवर, इन्फ्रास्ट्रक्चरवर जवळपास १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी सेंद्रीय शेती आणि ‘पीएम-प्रणाम’ योजना सुरु करण्यात आली होती.

कृषी क्षेत्रात कर्ज वाटपाचे लक्ष्य २० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आले होते. दरम्यान, या अर्थसंकल्पातही प्रत्येक क्षेत्रासाठी काहीतरी नवीन असेल, अशी आशा अनेकांना आहे. त्यामुळेच संपूर्ण देशातील नागरिकांचे आजच्या अर्थसंकल्पावर लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT