FM Nirmala Sitharaman present education budget 2024 Saam TV
Union Budget 2025 Highlights

Education Budget 2024: खुशखबर! विद्यार्थ्यांना १० लाखांपर्यंतचं शैक्षणिक कर्ज; अर्थसंकल्पात नेमकं काय मिळालं?

Budget 2024 announcement for educational loan: अर्थमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आता १० लाखांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे. या कर्जाद्वारे सरकार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणार आहे.

Priya More

मोदी सरकार ३.० चा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडला. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आता १० लाखांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे. या कर्जाद्वारे सरकार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणार आहे.

त्याचसोबत मोदी सरकार विद्यार्थ्यांना ७.५ लाख रुपयांचे स्किल मॉडेल कर्ज देखील देणार आहे. त्याचसोबत सरकारने विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्जावरील व्याजावर सूट देणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकार आर्थिक मदत करणार आहे. तसंच देशातील शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांपर्यंत कर्जावर दर वर्षी १ लाख विद्यार्थ्यांना थेट ३ टक्क्यांपर्यंत ई-वाऊचर देत व्याजावर सूट देण्याची घोषणा बजेटमधून करण्यात आली आहे.

त्याचसोबत उद्योगाच्या मदतीने नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल्स आणि शिशुगृहांची स्थापना करणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. सरकारी संवर्धित निधीच्या हमीसह ७.५ लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा देण्यासाठी मॉडेल स्किल लोन योजनेत बदल केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

SCROLL FOR NEXT