अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प २०२५ सादर केला. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि महिला वर्गासाठी अनेक घोषणा केल्या. या अर्थसंकल्पातून कोणाला कोणतं गिफ्ट मिळालं हे आपण जाणून घेणार आहोत....
फुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी फोकस प्रोडक्ट स्किम सुरू केली जाणार आहे. यामुळे २२ लाख तरुणांना रोजगार आणि ४ लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. स्टार्टअप्सना फंड देण्यासाठी नवीन फंडची स्थापना करण्यात येणार आहे.
५ लाख महिलांसाठी नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रथमच महिला उद्योजकांना पुढील ५ वर्षांमध्ये २ कोटी रुपयांपर्यंत मुदत कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.
IIT मध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. तसच IIT पटनाचा विस्तार केला जाईल. येत्या ५ वर्षांत सरकारी शाळांमध्ये ५० हजार अटल टिंकरिंग लॅबची स्थापना केली जाईल. भारतनेट प्रकल्पांतर्गत, ग्रामीण भागातील सर्व माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल. IIT आणि IISc मध्ये तांत्रिक संशोधनासाठी पीएम रिसर्च फेलोशिप योजनेअंतर्गत पुढील ५ वर्षांत १० हजार फेलोशिप प्रदान केल्या जातील. ५ नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंगची स्थापना केली जाईल.
२०२५ मध्ये म्हणजे या वर्षामध्ये आणखी ४० हजार नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सरकार ४० हजार घरं बांधणार असून परवडणाऱ्या किंमतीमध्ये सर्वसामान्यांना ही घरं खरेदी करता येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना यावर्षामध्ये हक्काचे घर मिळणार आहे.
१२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर लागणार नाही. अर्थमंत्र्यांनी नवीन कर स्लॅब जाहीर केले.
पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा करण्यात आली. राज्याच्या मदतीने ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेचा १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. १०० जिल्ह्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. राज्याच्या मदतीने ही योजना देशभरात राबवली जाणार आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
जीवनरक्षक ३६ औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द केला जाणार आहे. सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर बांधले जातील. कॅन्सरवरील औषधे स्वस्त होतील. ६ जीवरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी कमी करून ५ टक्के करण्यात येणार आहे.
२०३३ पर्यंत स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या ५ लहान मॉड्यूलर अणुभट्ट्या कार्यान्वित केल्या जातील.
बिहारमध्ये ग्रीनफिल्ड विमानतळाची सुविधा दिली जाणार आहे. हे पटना विमानतळाच्या क्षमतेच्या विस्ताराव्यतिरिक्त असतील. १२० नवीन गंतव्यस्थानांशी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सुधारित UDAN योजना सुरू केली जाईल.
चामडे आणि चामड्याापासून तयार केलेल्या वस्तू स्वस्त होतील. कारण त्यावर इंपोर्ट ड्यूटी फ्री करण्यात आली आहे. कापड, LED टीव्ही स्वस्त होईल. मोबाईल, लिथियम बॅटरी आणि इलेक्ट्रिक वाहनेही स्वस्त होतील.
सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी ५ कोटी ते १० कोटी रुपयांच्या अतिरिक्त कर्जाची घोषणा करण्यात आली. पुढील ५ वर्षांत १.५ लाख कोटी रुपये देण्यात येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.