Budget 2024 News: Lakhpati Didi Yojana Information in Marathi Saam Tv
Union Budget 2025 Highlights

Lakhpati Didi Yojana: अर्थसंकल्पात उल्लेख झालेली लखपती दीदी योजना नेमकी काय आहे? वाचा सविस्तर

Lakhpati Didi Yojana Information and Benefits in Marathi: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन आज म्हणजेच १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प मांडला. त्यात निर्मला सितारामन यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातील महत्त्वाची योजना म्हणजे लखपती दीदी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

About Lakhpati Didi Yojana:

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन आज म्हणजेच १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प मांडला. त्यात निर्मला सितारामन यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाच्या योजना मांडल्या आहेत. त्यातील महत्त्वाची योजना म्हणजे लखपती दीदी. लखपती दीदी या योजनेबाबत निर्मला सितारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. लखपती दीदी योजनेची संख्या २ कोटींवरुन ३ कोटी करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. लखपती दीदी योजनेत आतापर्यंत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. ही योजना नक्की काय आहे ते जाणून घेऊया. (Latest News)

लखपती दीदी योजना

लखपती दीदी योजना ही मोदी सरकारची महिलांसाठी राबवण्यात आलेली खास योजना आहे. महिलांना सक्षमीकरण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. १५ ऑगस्ट २०२३ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेत महिलांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते.

या योजनेमुळे बचत गटांशीसंबंधित असलेल्या कोट्यवधी महिलांना फायदा होणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांचा या योजनेमध्ये समावेश आहे. या योजनेत स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे जो महिलांना विशिष्ट क्षेत्रातील ट्रेनिंग देते. या ट्रेनिंगच्या मदतीने त्यांना पैसे कमावता येणार आहेत. यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. या योजनेत महिलांना बिझनेस सुरु करण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात येईल. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये महिलांना आत्मनिर्भर करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे, त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यात महिलांना बिझनेस प्लान, मार्केटिंगबाबत ट्रेनिंग दिले जाते. या योजनेत महिलांना कमी खर्चात आरोग्य विमादेखील दिला जातो. लखपती दीदी योजना मायक्रोक्रेडिट सुविधा देतात. ज्यात महिलांना बिझनेस, शिक्षण आणि स्मॉल लोन मिळते.

लखपती दीदी योजनेत हे लाभ दिले जातात

आर्थिक साक्षरता वर्कशॉप (Finanacial Literacy Wirkshop)

सेव्हिंग इन्सेंटिव्ह (Saving Incentives)

मायक्रोक्रेडिट सुविधा (MicroCredit Benefits)

स्किल डेव्हलपमेंट आणि वोकेशनल ट्रेनिंग (Skill Devlopment And Vocational Trainig)

व्यावसायिक प्रशिक्षण (Enterprenurship Supprt)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला संबंधित राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. महिला बचत गटात सदस्य असणे बंधनकारक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT