Union Budget 2025 yandex
Union Budget 2025 Highlights

Union Budget 2025: नोकरदारवर्गाला मोठं गिफ्ट ! आयकर भरण्याची मर्यादा वाढवली

Union Budget 2025: अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये मोठी घोषणा केली आहे. आता इन्कम टॅक्स न भरलेल्यांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. टॅक्स भरण्याची मर्यादा ४ वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Siddhi Hande

करदात्यांसाठी महत्त्वाची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. आता टॅक्स न भरलेल्यांसाठी आयकर फाइल करण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता ४ वर्षांसाठीचा आयकर तुम्ही भरु शकतात.त्यामुळे करदाते ४ वर्षांचा आयटीआर एकाच वर्षी फाइल करु शकणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी याबाबत घोषणा केली आहे.

आता आयटीआर फाइल करण्यासाठी मर्यादा २ वर्षांची होती. तुम्ही २ वर्षांचा आयटीआर एकावेळी भरु शकत होता. मात्र, आता ही लिमिट वाढवण्यात आली आहे. याबाबत निर्मला सितारामन यांनी माहिती दिली आहे.

टीडीएसची मर्यादा वाढली

अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसची मर्यादा १ लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच रेंटवरील टीसीएसची मर्यादा २.४० लाखांवरुन ६ लाख करण्यात येणार असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.

नवीन कर प्रणालीमध्ये वार्षिक उत्पन्न १२ लाख

अर्थसंकल्पात नोकरदार वर्गासाठीही घोषणा करण्यात आली आहे. नवीन कर प्रणालीमध्ये वार्षिक उत्पन्न १२ लाख उत्पन्न कर लागणार आहे. नवीन कर प्रणालीच्या स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहे. ४ लाखांवर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. ४ ते ८ लाख उत्पन्नावर ५ टक्के, ८ ते १२ लाखांच्या उत्पन्नावर १० टक्के कर भरावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: दुकानात मिळणारे अ‍ॅलोव्हेरा जेल चेहऱ्यावर लावणे होतील 'हे' नुकसान; आजपासूनच घ्या काळजी

CBSE दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, दहावीची परीक्षा दोनदा होणार

Maharashtra Live News Update: कोरेगाव भीमामध्ये बसला आग, प्रवाशांंची धावाधाव

Accident News: भयंकर अपघात! दुचाकी समोरासमोर धडकल्या, पती-पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू

Earrings Designs: साडीपासून ते लेहेंग्यापर्यंत...; या कानातल्यांच्या डिझाईन्स आहेत कोणत्याही आऊटफिटसाठी परफेक्ट चॉइस

SCROLL FOR NEXT