Kisan Credit Card HT
Union Budget 2025 Highlights

Agricultural Budget 2024: किसान क्रेडिट कार्डवर अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, सगळेच शेतकरी करू शकणार अर्ज

Kisan Credit Card: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सातवा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजनांची घोषणा केलीय. किसान क्रेडिट कार्ड संदर्भातही सरकारने एक घोषणा केलीय.

Bharat Jadhav

एनडीए सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सातवा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देण्यात आलंय. किसान क्रेडिट कार्डच्या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केलीय. देशातील अजून पाच राज्यांमध्ये पीएम किसान कार्ड जारी केले जातील. नैसर्गिक शेतीसाठी १ कोटी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2024-25 साठी त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला. किसान क्रेडिट कार्डबाबत अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केल किसान क्रेडिट कार्ड 5 राज्यांमध्ये सुरू केले जाईल. केसीसी ज्या शेतकऱ्यांकडे असेल त्या शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशके इत्यादी शेतीच्या कामांसाठी कर्ज दिलं जातं. आता केसीसीसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. यात स्वत:च्या मालकीची जमीन असणारे, इतरांची जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो. शेतीसंबंधीच्या कामासाठी आर्थिक मदत करणं हा किसान क्रेडिट कार्ड योजनेचा मुख्य हेतू आहे.

सरकारकडून शेती, तसेच शेतीपुरक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. सरकार कोळंबी शेती आणि विपणनासाठी वित्तपुरवठा देखील करणार आहे. डाळींचे उत्पादन, साठवण आणि विपणन मजबूत करण्याचे उद्दिष्ट असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं. मुद्रा कर्ज मर्यादा वाढवून 20 लाख रुपये झाली

अर्थसंकल्पात एमएसएमई आणि मॅन्युफॅक्चरिंग बाबतही घोषणा करण्यात आलीय. बँकेचे कर्ज चालू ठेवण्यासाठी एक नवीन व्यवस्था अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली. मुद्रा कर्ज मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात आलीय.

दरम्यान, किसान क्रेडिट कार्डवर एकूण 9% व्याजदराने कर्ज दिलं जातं. या योजनेत केंद्र सरकारकडून 2% अनुदान दिले जाते. कर्ज घेतल्यानंतर ते कर्ज एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी परतफेड केली तर शेतकऱ्यांना आणखी तीन टक्के सवलत दिली जाते. अशा प्रकारे या कार्डवर घेतलेल्या कर्जासाठी व्याजदर केवळ ४ टक्केच राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : लग्न करण्यास नकार दिल्याने हत्या, प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरला विष देऊन संपवलं

Periods and Shravan : मासिक पाळीत श्रावणाचा उपवास करावा की नाही?, जाणून घ्या वैज्ञानिक कारणे

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT