Pune ED Breaking | पुण्यात या दोन ठिकाणी ईडीचे छापे, पाहा व्हिडिओ
Pune ED Breaking | पुण्यात या दोन ठिकाणी ईडीचे छापे, पाहा व्हिडिओ Saam Tv
ब्लॉग

...म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ससेमिरा?

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई: मुंबई महानगर पालिका निवडणूकीची (Mumbai Municipal Corporation Elections) घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) याच्या घरावर 72 तास IT विभागाने (Income Tax Department) कारवाई केली. या कारवाईमुळे शिवसेना नगरसेवकांमध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. पालिका निवडणुकीत शिवसेनेची घोडदौड रोखण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे लावल्याचा आरोप आता केला जात आहे.

मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे शिवसेनेचे (Shivsena) उपनेत्यांपैकी एक मोठे नेते आहेत. काही दिवसा़पूर्वीच जाधव यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. जाधव यांनी दुबईत (Dubai) असलेल्या 'सिनर्जीत व्हेंचर्स' आणि 'सईद डोन शारजा' या दोन कंपन्या तयार करून त्यात पैशांची गुंतवणूक केली आहे. या दोन्ही कंपन्या यशवंत जाधव कुटुंबीयांच्या असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केला. तसेच या कंपनीत पैसा लावण्यासाठी जाधव यांनी प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कोलकत्ता येथील एक बोगस कंपनीची मदत घेतल्याचा आरोप या वेळी किरीट सोमय्या यांनी केला होता. हा काळा पैसा नेमका यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांनी कोठून आणला? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. (Yashwant Jadhav IT Raid Information)

यशवंत जाधव यांनी आपल्याकडे असलेली रोख रक्कम प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या शेल कंपनीत टाकली. साधारणपणे पंधरा कोटीचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कंपनीच्या संचालक पदीही जाधव कुटुंबियचं आहे. तसेच आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांनी प्रतिज्ञापत्रात संपत्ती संदर्भात माहिती दिली आहे. त्यामध्ये संपत्ती लपवण्याचा आरोप असून त्याची सुद्धा चौकशी आयकर विभाग करताय.

हे देखील पहा-

या संपूर्ण कारवाईनंतर IT विभागाने जाधव कुटुंबियांना कारवाई संदर्भात माध्यमांशी बोलण्यास मनाई केली आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार या कारवाई दरम्यान जाधव याच्यावर अनेकदा विविध कागदपत्रांवर जबरदस्ती स्वाक्षरी घेतल्याचे बोलले जाते. तसेच जाधव कारवाईला सहकार्य करत असताना. IT अधिकार्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर आधिच अपेक्षित धरून लिहिल्याचे सांगितले जाते. कारवाई दरम्यान IT अधिकार्यांनी जाधव वास्तव्यास असलेला संपूर्ण माळा बंद केला होता. इमारतीच्या प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी आणि अंग झडती केली जात होती. चार दिवस केलेल्या या कारवाईचा अहवाल लवकरच IT चे अधिकारी सादर करतील, यामध्ये आर्थिक गैरव्यवहार संदर्भात ज्याप्रकारे आरोप केले गेलेत त्यासंदर्भात पुरावे आढळले असतील तर या प्रकरणात पुढील चौकशी IT चे अधिकारी करतील. (Yashwat Jadhav IT Raid Updates)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Export News Today: 550 रुपये प्रतिमॅट्रिक टन शुल्क! कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Crime News : लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीला नेले पळवून, वैद्यकीय तपासणीनंतर कुटुंबाला बसला धक्का

Loksabha Election: ब्रेकिंग! सूरत, इंदुरनंतर काँग्रेसला आणखी एक धक्का; लोकसभा उमेदवाराची निवडणुकीतून माघार

Vishal Pawar Case Update | विशाल पवार मृत्यूप्रकरणाला नवं वळण

Kolhapur Jail News: कैद्यांपर्यंत कोण पोहोचवतंय मोबाईल फोन? कोल्हापूर जेलमधून आणखी 10 मोबाईल जप्त!

SCROLL FOR NEXT