UP Election: भाजपच्या प्रचाराची सूत्रे राहणार दिल्लीच्याच हाती  SaamTV
ब्लॉग

UP Election: भाजपच्या प्रचाराची सूत्रे राहणार दिल्लीच्याच हाती

उत्तर प्रदेशाच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचारतोफा २३ जानेवारीपासून पुन्हा धडाडणार आहेत. पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शहा व अन्य नेते जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, रोड शो याद्वारे राज्यात तुफानी प्रचार सुरू करतील

साम टिव्ही

त्तर प्रदेशाच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचारतोफा २३ जानेवारीपासून पुन्हा धडाडणार आहेत. पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शहा व अन्य नेते जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, रोड शो याद्वारे राज्यात तुफानी प्रचार सुरू करतील. अलीकडे काही मंत्री व आमदारांनी भाजपला रामराम केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या (BJP) प्रचाराची मुख्य सूत्रे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याऐवजी आता दिल्लीच्या हाती राहतील हेही यातून स्पष्ट झाले आहे. (Up Elections Modi Shah to handle bjp campaign)

मोदी (Naredndra Modi) व शहांकडे प्रचारसूत्रे असल्याने भाजप ३०० च्या वर जागा नक्की मिळविणार, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळातून व्यक्त होतो. त्याचवेळी पंजाब व गोव्यासह अन्य राज्यांच्या प्रचार मोहीमांची काटेकोर आखणीही भाजप (BJP) नेतृत्वाने केली आहे. निवडणूक आयोगाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सभा, रोड शो यावर बंदी घातली आहे. आधी १५ जानेवारी व नंतर २२ जानेवारीपर्यंत ही बंदी राहील. त्यानंतर मात्र आयोगाची बंदी राहणार नाही हेही भाजप नेत्यांच्या निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेतून दिसते.

या बंदीतून भाजप मंत्री-आमदारांना वगळण्यात येत असल्याचा व त्यांच्या गर्दी जमविण्याकडे निवडणूक आयोग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे. मात्र ही त्यांची निराश मानसिकता आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. डिजिटल प्रचारातही भाजपने मोठी आघाडी घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ओबीसी, दलित, जाट या मतपेढ्यांतील महिला व विशेषतः पहिल्यांदा मतदान करणारे युवक यांच्यावर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे या नेत्याने नमूद केले. यूपीतील प्रमुख लढाई भाजप व सपा यांच्यातच असल्याचे मान्य करताना या भाजप नेत्याने बसपा, प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस व एएमआयएमचे असदुद्दिन ओवैसी हे भाजपच्या दृष्टीने रिंगणात नसलेले खेळाडू आहेत असे सांगितले. त्यांच्या मते भाजप सोडून जाणारे स्वामीप्रसाद मौर्य व इतरांमुळे भाजपला काहीही नुकसान होणार नाही, झालाच तर फायदा होईल.

उलट मौर्य व इतरांना त्यांचेच मतदार विचारतील की भाजप इतका वाईट आहे हे पावणेपाच वर्षे सत्ता उपभोगल्यावर तुम्हाला कसे समजले, असा दावा या नेत्याने केला. दरम्यान, अमित शहा यापुढे पंजाबसह इतर राज्यांबरोबरच उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त वेळ देतील, असे या नेत्यांनी स्पष्ट केले. सभा- रोड शो या माध्यमातून अमित शहा राज्य पिंजून काढणार आहेत. ओबीसी-दलित समीकरण भाजपच्या बाजूने तेवढाच कौल देईल, याची तजवीज करणे व पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट मतदारही भाजपकडे पुन्हा वळल्याची खात्री करून घेणे या दोन आघाड्यांवर भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्व काम करत आहे. त्यात शहा यांची भूमिका मोठी असेल.

तिकीट वाटप पक्षाच्या हाती

गोव्यात दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांनी पणजीतून भाजपचे तिकीट मागितले आहे. उत्पल यांनी अलीकडे बंडखोरीची भाषा केली. त्याबाबत या नेत्याने, भाजपमध्ये दबाव तंत्राला बिलकूल महत्व दिले जात नाही, असे सांगितले. तिकीटवाटप राज्यात नव्हे तर दिल्लीत अंतिम होते. पक्ष हा व्यक्तीपेक्षा मोठा असतो व दिवंगत पर्रीकर यांचे भाजपमध्ये योगदान अमूल्य आहे. मात्र तिकीट वाटप व्यक्तिंच्या नव्हे तर पक्षाच्या हाती असते. गोव्यातील उमेदवारीबाबतही पक्षाची निवडणूक समिती योग्य वेळी निर्णय करेल, असे सांगून या नेत्याने उत्पल पर्रीकर हा विषयच थांबविला.

Edited By- Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT