shivendraraje bhosale & udayanraje bhosale saam tv
ब्लॉग

Satara: सातारकरांनाे सावधान! नारळ फाेड्या गॅंग आली : शिवेंद्रसिंहराजे भाेसले

गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे भाेसले यांनी पालिका अधिका-यांना विकासकामांबाबत सूचना करण्यास प्रारंभ केला आहे.

ओंकार कदम

सातारा : सातारा पालिकेत (satara muncipal council) फक्त टक्केवारी गोळा करणे, कमिशन आणि घंटागाडीचे हफ्ते यापेक्षा दुसरीकडे सातारा विकास आघाडीचे लक्ष नाही. सातारा (satara) पालिकेची विकासकामे ही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अवलंबून असल्याचा चिमटा आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी खासदार उदयनराजेंच्या (Udayanraje bhosale) सातारा पालिकेत सत्ता असलेल्या सातारा विकास आघाडीला काढला आहे. (shivendraraje bhosale latest marathi news)

आमदार भाेसले म्हणाले निवडणुका (election) लागणार असल्याच्या गडबडीने नारळ फोडण्याचे प्रकार साताऱ्यात पुन्हा सुरू झालेत. मात्र पाठीमागे ओबीसी आरक्षणावरून निवडणूक प्रक्रिया स्थगित होताच नेहमीसारख साताऱ्यातुन गायब होण्याचं चित्र दिसलं असल्याचा टोला शिवेंद्रराजेंनी (shivendraraje bhosale) खासदार उदयनराजेंना त्यांचे नाव न घेता लागवला.

गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे भाेसले यांनी पालिका अधिका-यांना विकासकामांबाबत सूचना करण्यास प्रारंभ केला आहे. त्यापार्श्वभुमीवर सध्या पालिकेवर प्रशासक असल्याने खासदार उदयनराजे भाेसले यांनी त्यांना त्यांचा कारभार करुन द्यावा असेही आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : दिवाळीनिमित्त परिवार बाहेरगावी; बांधकाम व्यवसायिकाच्या घरी २२ लाखांची चोरी

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

Maharashtra News Live Updates: निवडणूक आयोगाकडे मिलिंद देवरा यांच्या विरोधात तक्रार

VIDEO : 'फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही', मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

Samantha Fitness Secret: समंथाने सांगितला फिटनेसचा राज, वजन वाढू नये म्हणून खाते 'हे' पदार्थ

SCROLL FOR NEXT