रश्मी पुराणिक
2020 साली झालेल्या कोविड लॉकडाउन Lockdown दरम्यान सगळ्याच लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झालेला त्यात ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर खूपच वाईट परिणाम झाला असून 2019 च्या तुलनेत आत्महत्यांमध्ये Suicide 31 टक्के वाढ झालेली दिसून येते
मुंबई पोलीस Mumbai Police कडून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार एकूण 1282 नागरिकांनी 2020 वर्षात आत्महत्या केली म्हणजेच सरासरी एका दिवसात तीन व्यक्तींनी आत्महत्या केली. 2019 मध्ये हा आकडा 1229 इतका होता म्हणजेच चार टक्के वाढ झालेली दिसून येते परंतु लॉकडाउन पुरुषांवर व महिलांवर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो.
18 ते 60 वयोगटातील महिलांमध्ये आत्महत्यांची संख्या 13 टक्क्यांनी घटली. 2020 मध्ये 312 तर 2019 मध्ये 269 आत्महत्या झाल्या त्याच उलट 18 ते 60 वयोगटातील पुरुषांमध्ये आत्महत्यांची संख्या14 टक्क्यांनी वाढले असून 2019 मध्ये 715 वरून 2020 मध्ये 816 आत्महत्या झाल्या.
या आकडेवारी वरून दिसून येते की पुरुषांना आर्थिक नुकसान, बेरोजगारी तसेच वेगवेगळ्या व्यसनाने त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आणि त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलले दिसते. त्या उलट आपलं पूर्ण परिवार एकत्र असल्या कारणाने महिलांच्या मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम झालेला दिसून येतो व त्यांच्या आत्महत्येत घट झालेली दिसते.
हे देखील पहा -
कोविड लॉकडाउनचा सगळ्यात वाईट परिणाम हा ज्येष्ठ नागरिकांवर झालेला आहे. त्यात महिला ज्येष्ठ नागरिकांमध्ये तब्बल 60 टक्क्यांनी आत्महत्या वाढलेली आहे, 2019 मध्ये 23 वरून हा आकडा 2020 मध्ये 37 झालेला आहे त्याच विपरीत पुरुष ज्येष्ठ नागरिकांमध्ये 21 टक्के वाढ झालेली असून 2019 मध्ये 69 वरून 2020 मध्ये 84 आत्महत्या झालेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक आपल्या दैनंदिन गरजेसाठी व जगण्यासाठी पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असतात यात कोविड लॉकडाउन मुळे त्यांच्यावर खूप मोठं संकट उभे राहिले आणि त्याच नैराश्यातून बऱ्याच लोकांनी आत्महत्या केलेली दिसून येते. कोविड लॉकडाउन मुळे लहान मुलांच्या आत्महत्येत 13 टक्के घट झाल्याचे दिसून येते याचं प्रमुख कारण की लहान मुले या काळात आपल्या आई-वडीलांच्या नजरेत राहिले होते.
'The Young Whistleblowers Foundation' संयोजक जितेंद्र घाडगे यांचे म्हणणे आहे की, "एकंदरीत दोन्ही सरकारने कोविड लॉकडाउनचा लोकांचा मानसिक आरोग्यावर होणाऱ्या वाईट परिणामाचे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते, ज्येष्ठ नागरिकांना कोविडचा जास्त धोका असल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त निर्बंध लादण्यात आले होते याचा फारच वाईट परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर झालेला दिसून येतो याव्यतिरिक्त सरकारकडून आर्थिक संकटात सापडलेल्या मुख्यतः मध्यमवर्गीयांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत दिली गेली नाही ज्यामुळे बराच पुरुषांनी आत्महत्या केलेली दिसून येते
सरकारने लॉकडाउन चे नियम बनवताना त्याचा मानसिक आरोग्यवर किती वाईट परिणाम होतो याचा अभ्यास करणे गरजेचे आहे व त्या दृष्टीने भविष्यात लॉकडाउन चे नियम थोडेसे शिथिल ठेवून लोकांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून सतर्कता बाळगणे व त्यांना आर्थिक मदत देणे फार महत्त्वाचे आहे."
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.