ममता दिदिंच्या मुंबई दौऱ्यामागं दडलंय काय? Saam Tv
ब्लॉग

ममता दिदिंच्या मुंबई दौऱ्यामागं दडलंय काय?

गेल्या दोन दिवसापासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) या मुंबई दौऱ्यावर आहेत.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

वैदेही काणेकर

मुंबई: गेल्या दोन दिवसापासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) या मुंबई दौऱ्यावर आहेत. काल आणि आज दोन दिवस ममता यांचे अनेक कार्यक्रम या निमित्ताने बघायला मिळाले आहेत, पण मुंबई दौऱ्यावर आलेल्या ममता यांचा राजकीय संदेश देखील आहे.

हे देखील पहा-

पश्चिम बंगाल निवडणुकीमध्ये (West Bengal Elections) भाजपला (BJP) धूळ चारल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा एकाच अजेंडा आहे ती म्हणजे भाजप विरोधात मोट बांधणे. अशातच आता मुंबई दौऱ्यावर आलेल्या ममता यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राउत (Sanjay Raut) यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली. शिवाय महत्वाचा संदेश मुख्यमंत्र्याना (CM Uddhav Thackeray) दिला असल्याची माहिती मिळत आहे. भाजप विरोध हा मुख्य मुद्दा असल्याचे म्हणत ममता यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.

केवळ आदित्य ठाकरे आणि संजय राऊत नाही तर देशाच्या राजकारणात राजकीय वजन असलेले शरद पवार (Sharad Pawar) यांची ही भेट ममता बॅनर्जी यांनी घेतली. या भेटीत राजकीय आखाड्यात महत्त्वाच्या आराखाद्यसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

भाजपला केंद्रात टक्कर देण्यासाठी देशातील सर्वच विरोधातील पक्षांना एकत्र यावे लागेल. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे भाजपच्या विरोधात बळकटपणे उभं आहे. हेच समीकरण देशपातळीवर करण्याबाबतचे संकेत आणि संदेश ममता बॅनर्जी यांच्या मुंबईत दौऱ्यात दिसून येत आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुका पहाता सध्यातरी भाजपविरोधात कोणी विरोधक भक्कमपणे दिसून येत नाही. अशातच 'हीच ती वेळ' म्हणत शिवसेनेला जवळ करून आगामी काळात महाराष्ट्र मॉडेल पुढे करत भाजपला टक्कर देण्याची तयारी ममता यांनी केलेली दिसून येत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar : हिंगोलीत शरद पवारांची राष्ट्रवादी भुईसपाट, जिल्हाध्यक्षांसह नगरसेवकांनी घड्याळ बांधलं

Maharashtra Live News Update: नागपूर रेल्वे स्टेशनवर माफियांचे आणि कुख्यात हिस्ट्रीशीटरचे वर्चस्व, शिवसेनेचा गंभीर आरोप

Lightning Strike : चिपळूणमध्ये परतीच्या पावसाचे थैमान; वीज पडून तरुणाचा मृत्यू, ६ जण जखमी

YouTube डाऊन! व्हिडीओ पाहण्यात अडथळे, जगभरातील यूजर्स वैतागले; नेमकं काय घडलं?

Shocking: कॉलेजमध्ये कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनींचे गुपचूप व्हिडीओ काढले, ABVP च्या ३ कार्यकर्त्यांना बेड्या

SCROLL FOR NEXT