Rajesh has done a great job of boosting the morale of the corona patients  
ब्लॉग

कोरोना रुग्णाच्या मदतीला धावून मनोबल वाढविणाऱ्या राजेशवर कौतुकाची थाप... 

प्रमिल क्षेत्रे

बुलढाणा : संपूर्ण देशाला गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने Corona ग्रासले आहे.  दुसऱ्या लाटेत Second Wave असंख्य लोक कोरोनाने मृत्युमुखी पडले. अश्या या कोरोनाच्या भीतियुक्त परिस्थितीत बुलढाणा Buldhana जिल्ह्यातिल एका छोट्याशा शिरपुर या गावातील राजेश नावाचा तरुण पुढे आला आहे. Rajesh has done a great job of boosting the morale of the corona patients 

जीव धोक्यात घालून  प्रत्येक रुग्णाच्या आर्थिक मदतीला तो धावून आला आहे. एवढेच नव्हे तर दररोज आईसीयू ICU मध्ये जावुन रुग्णाचे मनोबल वाढविन्याचे मोलाचे कार्य त्याने केले आहे. त्यांमुळे अनेक रुग्ण बरे झाले आहेत, त्यांच्या कार्याचा सन्मान अनेक सामाजिक संघटनानी केला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या मोठ्ठया प्रमाणात वाढली होती. रुग्णांना बेड मिळत नसे, अश्यावेळेस स्वतः धावून बेड मिळवून देणे, तसेच बाधितांना भेटण्यासाठी त्यांचे सख्खे नातेवाईक भीतीपोटी जात नव्हते, अश्या वेळेस स्वतः राजेश त्या रुग्णांना जावुन भेट देत असत. त्यांचे मनोबल वाढवत असत.

बाधितांच्या संपर्कात राहून हजारो रुग्णांची दिवसरात्र सेवा त्यांनी केली, आरोग्य यंत्रणा हतबल झाली असताना त्यांना सहकार्य करण्याचे काम राजेश यांनी केले, राजेश गवई या तरुणाने जे रुग्ण मृत्युमुखी पडले अश्यावर स्मशानभूमि मध्ये स्वतः जाऊन अंत्यसंस्कार देखील केले आहेत.

या काळात जे रुग्ण बरे होऊन परतीच्या मार्गावर जाताना रुग्णाच्या चेहऱ्यावरील हास्य पाहुन ऊर्जा वाढत होती, असे राजेशने सांगितले आहे. राजेश गवई याने केलेल्या कार्याची दखल राज्यातील प्रतिष्ठित सामाजिक संघटना संवेदना प्रतिष्ठान या संघटनेने घेतली आहे. राजेश गवई यांचा सन्मान प्रशासनाने करावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackrey यांच्यकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

हे देखील पहा - 

राजेश गवई म्हणाले कि, मी एक समाजसेवा म्हणुन हे कार्य करीत राहिलो. या कोरोनाच्या परिस्थितीत खरी गरज होती ती औषधांसोबत ती मानसिक आधाराची. तो मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला, कारण कोविड रुग्णालयात सक्खे नातेवाईक सुद्धा घाबरत होते. तेव्हा तो रुग्ण एकटाच पडून राहायचा. अश्या वेळेस मी कोविड रुग्णालयात जावुन सर्व रुग्णांशी संवाद साधुन मानसिक आधार देत होतो. त्यमुळे बरेच रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याचे समाधन आहे मला. सुट्टी झाल्यावर रुग्ण जेव्हा आभार मानतात तीच आपली कमाई आहे असे राजेश गवई यांचे म्हणणे आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT