- नारायण राणे - Saam TV
ब्लॉग

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नारायण राणे भाजपचे "पोस्टर बॉय"

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. भाजपकडून सुरू करण्यात आलेली ही यात्रा म्हणजे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बिगुलं वाजल्याचे सांगितलं जातं

सूरज सावंत

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांची आज मुंबईत Mumbai जन आशीर्वाद यात्रा Jana Ashirwad Yatra सुरू आहे. भाजपकडून सुरू करण्यात आलेली ही यात्रा म्हणजे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने BJP बिगुलं वाजल्याचे सांगितलं जातं. Narayan Rane May be Star Campaigner of BJP in BMC Elections

या यात्रेत महापालिकेवर ३२ वर्ष सत्ता असलेल्या शिवसेनेच्या Shivsena पापाचा घडा भरला असून यंदा पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणारचं, असे म्हणत राणेंनी पालिका निवडणुकांची जबाबदारी स्विकारली आहे. त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीत Elections राणे हेच भाजपच्या बॅनरवरील 'स्टार प्रचारक' असतील यात शंका नाही.

खरंतर राणे मुंबईसह कोकणात 'जन आशीर्वाद यात्रा' करणार याची घोषणा करण्यात आल्यानंतरच ही यात्रा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशात राणेंनी प्रसारमाध्यमांसमोर याची कबुलीच दिल्यानं भाजप कामाला लागली आहे. यावरून राणे हेच पालिकेच्या निवडणुकीतीली स्टार प्रचारक असणार आहेत हे स्पष्ट होतं आहे. Narayan Rane May be Star Campaigner of BJP in BMC Elections

आतापर्यत भाजपकडून शिवसेनेला शिंगावर घेताना विचार केला जायचा. याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनाजवळ भाजप कार्यकत्यांसोबत झालेल्या राड्यातून आला होता. म्हणूनच शिवसेनेला चोख प्रतिउत्तर देण्यासाठी राणेंनीच पुढाकार घेतल्याचं पहायला मिळत आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देण्यावरून राणेंना शिवसेनेनं विरोध केला असताना नारायण राणेंनी थेट शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अर्थात दादरमध्ये शक्ती प्रदर्शनतर केलंच, आता कोकणातही राणे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे देखील या यात्रेकडे एका विशेष अर्थानं पाहिलं जात आहे. मात्र साहेबांच्या स्मृती स्थळाला इतरांप्रमाणे राणे हेही भेट देत आहेत, पक्षाकडूनही याबाबत कोणताही आदेश आलेला नाही, असं आमदार सदा सरवणकर यांनी सांगितल्यानं आक्रमक शिवसेना कुठे तरी बँकफूटवर गेल्याचं पहायला मिळालं. Narayan Rane May be Star Campaigner of BJP in BMC Elections

मुंबईच्या पालिका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंचा उपयोग निश्चित होऊ शकतो असं भाजपला वाटतं. तसेच मुंबई किंवा कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. अशा वेळी कोकणात राणेंसारख्या आक्रमक नेत्याला शिवसेनेच्या विरोधात मैदानात उतरवल्यास त्याचा राजकीय फायदा होईल, असा देखील भाजपचा कयास आहे. कारण, कोकणात भाजपची ताकद तुलनेनं खूपच कमी आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या या दौऱ्याला महत्त्व आहे.

नारायण राणेंनी शिवसेनेचा विरोध असताना ही बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाला भेट दिली. मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करण्याची संधीही सोडली नाही. ''महाराष्ट्राच्या इंच इंच जमिनीवर महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे. त्यामुळे, कुणीही विनाकारण आपल्याला झेपणार नाहीत, अशा गोष्टी बोलू नयेत. अन्यथा येणाऱ्या महापालिकेत गेल्या 2 वर्षात तुम्ही येथील जनतेला कसं पाठीमागे टाकलं, याचा उद्धार होणारच आहे. पण, येथील जनता तुमच्या कारभाराला कंटाळली आहे. त्यामुळे, मुंबई महापालिकेचा कारभार तुमच्या हातात राहणार नाही,'' असे राणेंनी म्हटले. Narayan Rane May be Star Campaigner of BJP in BMC Elections

दरम्यान, यानंतर आता नारायण राणे यांना डिवचण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत आहे का? तसेच शिवसेनेनं नारायण राणे यांच्या दौऱ्याचा धसका तर घेतला नाही ना? अशी चर्चा देखील आता सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT