Marathwada: जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी; ढगफुटीपेक्षा जास्त पाऊस! (Video)
Marathwada: जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी; ढगफुटीपेक्षा जास्त पाऊस! (Video) माधव सावरगावे
ब्लॉग

Marathwada: जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी; ढगफुटीपेक्षा जास्त पाऊस! (Video)

माधव सावरगावे, औरंगाबाद

माधव सावरगावे

औरंगाबाद : मराठवाड्यातील Marathwada Heavy Rain आठही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. या पावसामुळे सर्वच मोठी धरणं आणि प्रकल्प फुल्ल भरली आहेत इतर पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे.

हे देखील पहा-

मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरु झाल्यानंतर मंगळवारी पडलेल्या पावसाने हाहाकार उडालाय. कधी नव्हे ते एकाच दिवसात 182 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झालीय. विभागात 150 ते 180 टक्के पाऊस झाला आहे. यात सर्वाधिक नुकसान नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात झालं आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर इथं काही लोक अडकलेत, त्यांना NDRF च्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

नांदेड जिल्ह्यात मुसळधार;

नांदेड जिल्ह्यातील 54 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. बिलोली, मुखेड, कंधार, लोहा, ऊमरी या तालुक्यात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. मन्याड नदीला पूर आल्याने मुखेड बिदर मार्ग बंद झालेला आहे. गोदावरी नदीला पूर आल्याने गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विष्णुपुरी धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.

लातूर जिल्ह्यालाही अक्षरशः झोडपून काढले;

लातूर जिल्ह्यालाही अक्षरशः झोडपून काढले. लातूर जिल्ह्यातील 29 महसूल मंडळात अतिवृष्टीत झाल्याची नोंद आहे. मांजरा नदीला पूर आल्याने निलंगा, देवणी तालुक्यातील गावात आणि शेतीमध्ये पुराचे पाणी घुसलंय. देवणी तालुक्यातील बटनपूर लासोना गौंडगाव गावांमध्ये पाणी शिरले. जादू उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा नदीला पूर आल्यानं त्याचाही लातूर जिल्ह्यातील अनेक भागात फटका बसला.

उस्मानाबादच्या तेरणा नदीला पूर;

उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ महसूल मंडळात मुसळधार पाऊस झाला. तेरणा नदीला पूर आलेला नदीकाठच्या काही गावात पाणी शिरले.

बीड मध्ये ढगफुटीसारखा पाऊस;

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई केज धारूर या तालुक्यातल्या जवळपास 28 महसूल मंडळात ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील आपेगावला पाण्याचा वेढा पडला आहे. रात्री पडलेल्या पावसामुळे आवरगावच्या शिवारात एक कार सापडली आहे. धारुर तालुक्यातील वाणगंगा नदीला पूर आला आहे. अतिवृष्टीमुळे पाणीच पाणी झाल्याने सोमवारी रात्री उशिरा मांजरा धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यातील पूर्णा नदीला पूर;

परभणी जिल्ह्यातील पूर्णा नदीला पूर आल्याने त्याचं पाणी शेतीमध्ये घुसले. तर जालना जिल्ह्यातील भोकरदन, अंबड, बदनापुर तालुक्याला पावसाने रात्री अक्षरशः झोडपून काढले. गिरीजा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, सोयगाव, सिल्लोड तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे वैजापूर तालुक्यातील नारंगी मध्यम प्रकल्प पूर्ण भरल्याने पाणी सोडण्यात आले. पूर्णा, खेळणा, अंभई, सोयगाव नदीला पूर आला.

या पावसामुळे लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, परळी, धारूर तालुक्यातील सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन आता शेतकऱ्यांच्या हाताला लागेल की नाही याची शाश्वती राहिली नाही. बीड जालना औरंगाबाद जिल्ह्यात कापूस मका बाजरी पिकासह मोसंबीच्या बागांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय. आता पिकाची परिस्थिती पुन्हा खराब झाली आहे.

दोन आठवड्यापूर्वी मराठवाड्यात जवळपास साडेतीनशे महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झालं. मात्र त्याचे अद्याप पंचनामे पूर्ण झाले नाहीत. आता या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्यांचं जगणं अवघड करून टाकलंय. शेती पिकाचे झालेलं अतोनात नुकसान, घरांची पडझड, गुरंढोर वाहून गेली आणि घरात पाणी शिरल्याने होत्याचं नव्हतं झालं. अशात मराठवाड्यातील प्रत्येक गावातला माणूस मोडून पडल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे त्यांना आधार कोण देईल हा प्रश्न आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT