Maharashtra Breaking Updates 25th December 2023 Live in Marathi SAAM TV
ब्लॉग

Breaking News Live Updates : पंढरपुरातील शिवपुराण कथा कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी चोरांचा सुळसुळाट

Maharashtra Breaking Updates Live in Marathi: आज सोमवार २५ डिसेंबर २०२३, देश विदेशासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट वाचा फक्त साम टीव्हीवर...

Satish Daud

पंढरपुरातील शिवपुराण कथा कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी चोरांचा सुळसुळाट

पंढरपुरातील शिवपुराण कथा कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी चोरांचा सुळसुळाट झाला आहे. पहिल्याच दिवशी अनेक महिलांचे सोन्याचे दागिने व मनी मंगळसूत्र चोरीला गेले आहेत. किमान दहा महिला भाविकांचे दागिने चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. गर्दीत चोरांनी साधला डाव साधला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरीच्या तक्रारी दाखल करण्यातआला आहे.परभणीतील धारखेड गावात दोन गटांत तुंबळ हाणामारी, दुचाकी पुलावरून खाली फेकल्या

परभणीच्या धारखेड गावात दोन गटात तुंबळ हाणामारी

Parbhani News :

परभणीच्या धारखेड गावात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यात दोन्ही गटातील सहा ते सात जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हाणामारीनंतर मोटरसायकल पुलावरून खाली फेकून दिल्या गेल्या. हाणामारीचे कारण अस्पष्ट आहे. गंगाखेड पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री; 3 रूग्ण पॉझिटिव्ह

Beed corona News : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री झाली आहे. देशात कोरोना JN. 1 हा विषाणूचा उपप्रकार आढळला असून आता कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये बीड जिल्ह्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान जिल्हा रूग्णालय प्रशासन देखील त्यासाठी सज्ज झाले असून सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे आढळल्यास तात्काळ उपचार करून घ्यावेत, असे आवाहन बीड जिल्हा रूग्णालय प्रशासनाने केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी कोरोनाचे रूग्ण सापडले म्हणून घाबरून जाऊ नये, योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन देखील यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ललित पाटील प्रकरणी मोठी अपडेट, ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची चौकशी होणार

पुणे पोलीस करणार ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांची चौकशी होणार. विजय जाधव हे सध्या ससूनचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. संपूर्ण रुग्णालय हे अधीक्षक यांच्या नियंत्रणात असते. कैदी रुग्णांची सुरक्षा आणि त्यांच्यावर होणारे उपचार याबाबतची माहिती अधीक्षक यांना माहिती असणे आवश्यक असतं. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही चौकशी होणार.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा

⁠मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार कळवा ते अंबरनाथ शहरातील अनेक विकासकामांचा आढावा

⁠विविध फेस्टिव्हल आणि सोहळ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार भेट

⁠कल्याण लोकसभा मतदार संघातील अनेक मान्यवरांची भेट देखील घेणार

⁠आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कल्याण लोकसभा दौऱ्याला विशेष महत्व

पुण्यात गणेश पेठ परिसरातील गादी कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी

पुणे शहरातील गणेशपेठ परिसरात असलेल्या एका गादीच्या कारखान्याला सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे २ बंद २ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे.

आमदार राजन साळवी यांची एसीबी चौकशी प्रकरण, भाऊ, वहिनी आणि पुतण्याला नोटिसा

आमदार राजन साळवी एसीबी चौकशी प्रकरण

साळवी यांचे भाऊ, वहिनी आणि पुतण्याला रायगड एसीबीची नोटीस

27 डिसेंबर रोजी अलिबाग येथील एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

जमीन खरेदी आणि हॉटेलमधील भागीदारीबाबत होणार अधिक चौकशी

यापूर्वीही झाली होती साळवी कुटुंबीयांची चौकशी

मुंबई-गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ७ ते ८ किलोमीटर रांगा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

पर्यटकांना सलग तिसऱ्या दिवशीही करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना

नाताळ सणासोबतच लागून आलेल्या सुट्टयांमुळे होतेय गर्दी

मुंबई, पुण्यातील पर्यटकांची कोकणाला पसंती

पेण, माणगाव, इंदापूरजवळ सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

कांदा बाजारभावात 60 टक्क्यांची घसरण; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांदा बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव घसरले आहे.

लाल कांद्याचे जास्तीत जास्त बाजार भाव १,७५० पर्यंत खाली आले. दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याचे भाव ५५० रुपये तर गेल्या २० दिवसाच्या तुलनेत २५०० रुपयांनी घसरले आहेत.

मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळांची पोलीस सुरक्षा वाढवली, काय आहे कारण?

राज्याचे अन्न व नागरी सुरक्षा मंत्री छगन भुजबळ यांच्या पोलीस सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. भुजबळांच्या सुरक्षेत असलेल्या पोलिसांनी अलर्ट राहावं, असे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. यावरून मराठा समाज आक्रमक झाला असून भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हीच बाब लक्षात घेता, पोलिसांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आळे आहेत.

मध्यप्रदेशात बेईमानी झाली, नाहीतर निकाल आमच्याच बाजूने लागला असता: विजय वडेट्टीवार

मध्यप्रदेशचे सर्वे हा आमच्याच बाजूला आलेला होता. थोडी बेईमानी झाली नाहीतर निकाल आमच्या बाजूने लागला असता, असं खळबळजनक विधान राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी केलं आहे.

दुसऱ्यांचे पक्ष फोडून, दुसऱ्यांचे घर जाळून स्वतःच घर तुम्ही सजवतात हे लोकांना आवडणार नाही. त्याचा परिणाम महायुतीला भाजपला भोगाव लागेल, असा इशाराही वडेट्टीवर यांनी भाजपला दिला आहे.

दुसऱ्यांचे पक्ष फोडून, चिन्ह घेऊन, जी बेइमानी झाली पक्ष संपवण्याचा काम झालं. लोकांचे घर फोडायची आणि स्वतःच घर सजवायचं. लोकं हेच स्वीकारणार नाही. निवडणुकीच्या माध्यमातून या सगळ्याचे उत्तर जनता देईल, असंही ते म्हणाले.

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला मोठी गर्दी

साईबाबांच्या दर्शनाला मोठी गर्दी. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी. नवीन वर्षांच्या स्वागतापर्यंत शिर्डीत राहणार गर्दी. 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर खुलं ठेवण्याचा साईबाबा संस्थानचा निर्णय. मोठ्या संख्येनं पायी पालख्या शिर्डीत दाखल.

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट धोकादायक नाही, तीव्रता फारच कमी: अजित पवार

कोरोना व्हायरसचा नवीन विषाणू धोकादायक नाही. त्याची तीव्रता फारच कमी दिसत आहे, मात्र तरीही आपण मास्क लावणे, सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे गरजेचे आहे, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. याशिवाय राज्यातील कोरोना परिस्थितीवरही भाष्य केलं. मुंबई पुण्यात काही रुग्ण आढळून आले असले, तरीही काळजी करण्याचं काम नाही. असंही अजित पवार म्हणाले.

अहमदनगरमधील माळीवाडा बस स्टँड समोरील हॉटेलला भीषण आग, नागरिकांची पळापळ

अहमदनगर शहरात असलेल्या माळीवाडा बस स्टँड समोरील हॉटेल पंचरत्नला हॉटेलला सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर धाव घेतली.

क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने हॉटेलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे २ बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अस्पष्ट आहे.

गरज पडली तर मनोज जरांगेंना दिल्लीत घेऊन जाऊ : मंत्री शंभूराज देसाई

मराठा समाजाला नक्कीच टिकणारं आरक्षण मिळेल, मनोज जरांगे पाटील यांनी थोडा संयम घ्यावा अशी विनंती मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात क्यूरेटिव्ह याचिका दाखल केली असून या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले.

क्यूरेटिव्ह पीटिशन सुनावणी वेळी राज्य सरकारने काय मुद्दे मांडावे या बाबत जरांगे पाटील यांनी मदत करावी, असं आवाहन देखील त्यांनी केलं. याबाबत आम्ही जरांगेंना भेटणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.

मनोज जरांगे यांची तयारी असेल, तर आम्ही त्यांना दिल्लीला कायदेतज्ज्ञांसोबत बोलण्यासाठी घेऊन जाऊ, शक्य होत नसेल तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरकारच्या कायदे सल्लागारांशी चर्चा घडवून आणू, असंही मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

Breaking News Live Updates: निफाडमध्ये पारा घसरला, किमान तापमान ८.७ अंशांवर

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या सभेतून आंदोलनाची पुढची दिशा सांगितली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मराठा बांधवांनी सुरू केलेलं उपोषण मागे घेतलं असून मुंबईत धडकण्याची तयारी सुरू केली आहे.

उत्तरेतील हिमवृष्टी आणि तिकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. नाशिकच्या निफाडमध्ये पारा घसरला आहे. निफाडमधील किमान तापमान ८.७ अंशांवर आलं असून यंदाच्या हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद आहे.

राज्यात कोरोनाच्या जेएन.१ व्हेरिएंटचे रुण झपाट्याने वाढत आहेत. रविवारी ठाण्यात ५, पुणे महापालिका हद्दीत ०२, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी १ रुग्णाची नोंद झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. पुण्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजितदादांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यासह देशविदेश आणि क्रिडा क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT