Madhya Pradesh Assembly Election 2023 Results LIVE Saam TV
ब्लॉग

Madhya Pradesh Assembly Election 2023 Results LIVE : मध्य प्रदेशमध्ये कोणी किती जागा जिंकल्या, वाचा एका क्लिकवर

Madhya Pradesh Assembly Election 2023 Result Live Updates: मध्य प्रदेश विधानसभा २०२३ निवडणुकीचे निकाल आज म्हणजे रविवारी लागणार आहे. यासाठी सकाळी ७ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे.

Satish Daud

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये कोणी किती जागा जिंकल्या, वाचा एका क्लिकवर

- उज्जैन विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे महेश परमार विजयी.

- भाजपचे जितेंद्र पांडे हे बडनगर विधानसभा मतदार संघातून विजयी.

- भाजपचे सतीश मालवीय घाटिया विधानसभा मतदार संघातून विजयी.

- महिदपूर विधानसभेतून काँग्रेसचे दिनेश जैन बॉस विजयी.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये काही ठिकाणी काँग्रेस उमेदवार विजयी

- सरदारपूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसने प्रताप ग्रेवाल विजयी.

- गंधवानी विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमंग सिंगर विजयी.

- कुक्षीमधून काँग्रेसचे सुरेंद्र सिंह विजयी.

- मनवरमधून हिरालाल आलावा विजयी.

- धरमपुरीतून काँग्रेसचे पंचीलाल मेडा विजयी.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक जागांवर भाजप विजयी

- माजी मंत्री ललिता यादव छतरपूरमधून विजयी.

- पन्नाच्या तिन्ही जागा भाजपने जिंकल्या.

- धार विधानसभा मतदार संघातून भाजपच्या नीना वर्मा विजयी.

- बदनावर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे भंवरसिंह शेखावत विजयी.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये भाजप आमदार नरेंद्र सिंह तोमर विजयी

- मुरैना जिल्ह्यामध्ये भाजपचा ३ जागांवर तर काँग्रेसचा ३ जागांवर विजय

- अंबाह विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे आमदार देवेंद्र सखवार विजयी.

- दिमनी विधानसभा मतदार संघातून भाजप आमदार नरेंद्र सिंह तोमर विजयी

- मुरैनामधून काँग्रेस आमदार दिनेश गुर्जर यांची विजयाकडे वाटचाल.

- सुमावलीमधून भाजप आमदार एदल सिंह कंसाना विजयी.

- जोरा विधानसभा मतदार संघातून काँग्रेस आमदार पंकज उपाध्याय विजयी.

- सबलगड विधानसभा मतदार संघातून भाजप आमदार सरला रावत विजयी.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये भाजप 165 , काँग्रेस 64 जागांवर आघाडीवर

- मध्य प्रदेशातील 230 जागांचा आज निकाल

- राज्यातील सुमारे 165 जागांवर भाजप आघाडीवर आहे

- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पिछाडीवर आहे. काँग्रेस 64 जागांवर आघाडीवर आहे.

- तर इतर 1 जागांवर आघाडीवर आहेत.

MP Assembly Election 2023: इंदूरमध्ये कोण जिंकलं?, पाहा एका क्लिकवर

- इंदूरच्या देपालपूर मतदारसंघातून भाजपचे मनोज पटेल विजयी झालेत.

- त्यांनी विद्यमान आमदार विशाल पटेल यांचा पराभव केला.

- मनोज पटेल १४ हजार मतांनी विजयी झालेत.

- इंदूर 4 मधून आमदार मालिनी गौर विजयी झाल्या आहेत.

- इंदूर 3 मधून गोलू शुक्ला विजयी झाले आहेत.

MP Assembly Election 2023: खासदार नरेंद्र सिंह तोमर २४,४२९ मतांनी विजयी

- ग्वाल्हेरमधील दिमानी मतदार संघात भाजपचा विजय

- भाजपचे उमेदवार खासदार नरेंद्र सिंह तोमर २४,४२९ मतांनी विजयी

MP Assembly Election 2023: शिवराज सिंह चौहान बुधनी मतदारसंघातून 77,286 मतांनी विजयी

- शिवराज सिंह चौहान बुधनी मतदारसंघातून विजयी

- शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसच्या विक्रम मस्ताल यांचा केला पराभव

- 77286 मतांनी शिवराज सिंह चौहान विजयी

MP Assembly Election 2023: शिवराज सिंह चौहान यांची विजयाच्या दिशेने वाटचाल, 60,522 मतांनी आघाडीवर

- शिवराज सिंह चौहान यांची विजयाच्या दिशेने वाटचाल

- 9व्या फेरीत शिवराज सिंह चौहान हे बुधनी येथून 60,522 मतांनी आघाडीवर आहेत.

- आष्टा विधानसभेत 14 फेऱ्यांमध्ये भाजप 2,457 मतांनी आघाडीवर आहेत.

- इछावरमध्ये 9 फेऱ्यांमध्ये भाजप 8,630 मतांनी आघाडीवर आहे.

- सिहोर विधानसभेत 11 व्या फेरीत 20,735 ने भाजप आघाडीवर आहे.

- राज्यमंत्री प्रेमसिंग पटेल यांचा निवडणुकीत पराभव झाला.

- काँग्रेसचे राजेंद्र मंडलोई यांचा पराभव झाला.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशातील २ विधानसभा जागांचे निकाल स्पष्ट, या जागांवर भाजप विजयी 

- मध्य प्रदेशातील दोन विधानसभा जागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत.

- कालापीपल मध्ये भाजपने विजय नोंदवला आहे.

- तर रतलाममध्ये भाजपचे चैतन्य कश्यप ५० हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.

MP Assembly Election 2023: शिवराज सिंह चौहान समोर आलेल्या कलावर खूश

- मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान समोर आलेल्या कलावर खूश दिसत आहेत.

- त्यांनी पत्नी साधना आणि दोन मुलांसह सीएम हाऊसमधून विजय चिन्ह दाखवले.

Shivraj Singh Chauhan With Family

MP Assembly Election 2023: मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान भावुक

- मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान भावुक झालेत.

- सीएम हाऊसमध्ये काम करणाऱ्या माळीण राधाबाई यांनी मुख्यमंत्र्यांना फुल देऊन अभिनंदन केले.

- यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान भावूक झाले.

- राधाबाई सीएम हाऊसमधील फ्लॉवर बेड आणि गार्डनची देखभाल करतात

- मुख्यमंत्र्यांच्या देवाच्या पूजेसाठी दररोज त्या फुले आणतात.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशातील प्रमुख जागांवर कोण आघाडीवर?

- मध्य प्रदेशातील प्रमुख जागांवर कोण आघाडीवर?

- मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे बुधनी मतदार संघातून आघाडीवर.

- गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हे दतियामधून पिछाडीवर.

- आरोग्यमंत्री विश्वास सारंग हे नरेलामधून पिछाडीवर.

- माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे छिंदवाड्यातून पिछाडीवर.

- केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर हे दिमनीमध्ये आघाडीवर.

- केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्ते हे निवासमधून पिछाडीवर.

- केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल हे नरसिंगपूरमधून आघाडीवर.

- केंद्रीय मंत्री गणेश सिंग सतनामधून आघाडीवर.

- खासदार रिती पाठक या सिधीमधून आघाडीवर.

MP Assembly Election 2023: ग्वाल्हेरमध्ये सध्या भाजपचे उमेदवार आघाडीवर

- ग्वाल्हेर जिल्ह्यातील सर्व विधानसभा जागांवर भाजप आघाडीवर आहे.

- डबरामधून इमरती देवी आघाडीवर आहेत.

- दक्षिण ग्वाल्हेरमधून नारायण सिंह कुशवाह आघाडीवर आहे.

- ग्वाल्हेर पूर्वमधून माया सिंह, भितरवारमधून मोहनसिंग राठोड आघाडीवर आहेत.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये भाजप 155 , काँग्रेस 73 जागांवर आघाडीवर

- मध्य प्रदेशातील 230 जागांवरचा कल समोर आला आहे.

- राज्यातील सुमारे 155 जागांवर भाजप आघाडीवर आहे

- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पिछाडीवर आहे. काँग्रेस 73 जागांवर आघाडीवर आहे.

- तर इतर 2 जागांवर आघाडीवर आहेत.

MP Assembly Election 2023: एमपीच्या मनात मोदी आणि मोदींच्या मनात एमपी - शिवराज सिंह चौहान

- शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांशी संवाद साधला

- एमपीच्या मनात मोदी आहेत आणि मोदींच्या मनातही एमपी आहे.

- जनतेच्या मनात मोदींबद्दल अपार विश्वास आणि श्रद्धा आहे.

- मोदींनी इथे ज्या सभा घेतल्या आणि जनतेला संबोधित केलं. याने एमपीच्या जनतेच्या मनाला स्पर्श केला.

- दिल्लीत पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जी कामं केली. त्या कामांची आम्ही याठिकाणी व्यवस्थित अंमलबजावणी केली.

- केंद्र सरकारच्या मदतीने आम्ही इथे जे काम केलं ते जनतेच्या मनाला स्पर्श केले.

- जनतेची आम्हाला खूप चांगली साथ मिळाली

- कार्यकर्त्यांनी देखील खूप मेहनत घेतली.

- आम्ही प्रचंड बहुमताने पुन्हा सरकार स्थापन करणार यावर आम्हाला विश्वास होता.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशातील जनतेच्या मनामध्ये भाजपप्रती विश्वास, याचाच हा विजय - अश्विनी वैष्णव

- केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अश्विनी वैष्णव यांनी मध्य प्रदेशातील भाजपच्या विजयी आघाडीवर प्रतिक्रिया दिली आहे.

- मध्य प्रदेशमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे.

- आम्हाला यावर पूर्ण विश्वास आणि अपेक्षा होती.

- मध्य प्रदेशच्या जनतेच्या मनामध्ये भाजपप्रती विश्वास आहे. याचा आज विजय झाला आहे.

- मोदींच्या मनात मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या मनामध्ये मोदी आहेत.

- या १८ वर्षांत भाजपने चांगले काम केले.

- शिवराज सिंह चौहान यांनी केलेल्या कामाचा हा आशीर्वाद आहे.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये भाजप 138 , काँग्रेस 91 जागांवर आघाडीवर

- मध्य प्रदेशातील 230 जागांवरचा कल समोर आला आहे.

- राज्यातील सुमारे 138 जागांवर भाजप आघाडीवर आहे

- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पिछाडीवर आहे. काँग्रेस 91 जागांवर आघाडीवर आहे.

- तर इतर 1 जागांवर आघाडीवर आहेत.

MP Assembly Election 2023: PM मोदी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांसोबत विजयोत्सव करणार

- पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६.३० वाजता दिल्ली भाजप मुख्यालयात जाणार आहेत.

- भाजप मुख्यालयातून ते भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत कार्यकर्त्यांसोबत विजय साजरा करतील.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये भाजप 139 , काँग्रेस 89 जागांवर आघाडीवर

- मध्य प्रदेशातील 230 जागांवरचा कल समोर आला आहे.

- राज्यातील सुमारे 139 जागांवर भाजप आघाडीवर आहे

- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पिछाडीवर आहे. काँग्रेस 89 जागांवर आघाडीवर आहे.

- तर इतर 2 जागांवर आघाडीवर आहेत.

MP Assembly Election 2023: बुधनी विधानसभा मतदार संघात शिवराज सिंह चौहान ३०२३ मतांनी आघाडीवर

- बुधनी विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ३०२३ मतांनी आघाडीवर आहेत.

- आष्टा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार कमल सिंह २४१ मतांनी आघाडीवर आहेत.

- इछावर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार शैलेंद्र पटेल ५४२ मतांनी आघाडीवर आहेत.

- सिहोर विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार सुदेश राय १२०० मतांनी आघाडीवर आहेत.

Madhya Pradesh Election Result LIVE: मध्य प्रदेशमध्ये भाजपची मोठी आघाडी, काँग्रेस पिछाडीवर

मध्य प्रदेशच्या २३० जागांसाठी मतमोजणी सुरू झाली असून प्राथामिक कल हाती आले आहे. भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस पिछाडीवर आहेत. कलानुसार, भाजपने १५१ जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेस केवळ ७८ जागांवर आघाडीवर आहे.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये भाजप 151 , काँग्रेस 78 जागांवर आघाडीवर

- मध्य प्रदेशातील 230 जागांवरचा कल समोर आला आहे.

- भाजप 151 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस 78 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर 1 जागांवर आघाडीवर आहेत.

MP Assembly Election 2023: पीएम मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित करणार

- मध्य प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर आहेत.

- संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयामध्ये जााणार आहेत.

- पीएम मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये भाजप 150 , काँग्रेस 78 जागांवर आघाडीवर

- मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे.

- मध्य प्रदेशातील 230 जागांवरचा कल समोर आला आहे.

- भाजप 150 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस 78 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर 2 जागांवर आघाडीवर आहेत.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशातील दिमानी मतदारसंघातून नरेंद्र सिंह तोमर आघाडीवर

- मध्य प्रदेशातील दिमानी मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आघाडीवर आहेत.

- यावेळी भाजपने तीन केंद्रीय मंत्र्यांसह 7 खासदारांना उमेदवारी दिली आहे.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये भाजप 140 , काँग्रेस 86 जागांवर आघाडीवर

- मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे.

- मध्य प्रदेशातील 230 जागांवरचा कल समोर आला आहे.

- भाजप 140 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस 86 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.

MP Vidhan Sabha Election 2023: मध्य प्रदेशमध्ये सध्या भाजपचे उमेदवार आघाडीवर...

- नरसिंगपूरच्या गदरवाडामध्ये भाजप ३०६७ मतांनी आघाडीवर आहे.

- भाजपचे प्रल्हाद पटेल ३७०० मतांनी आघाडीवर आहेत.

- गदरवाडामधून भाजपचे राव उदय प्रताप सिंह ३०६७ मतांनी आघाडीवर आहेत.

- गोटेगावमधून महेंद्र नागेश, तेंदुखेडामधून संजय शर्मा आघाडीवर आहेत.

MP Vidhan Sabha Election 2023: मध्य प्रदेशमध्ये काही जागांवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर

- विजयराघोगडमधून संजय पाठक पहिल्या फेरीत 1000 मतांनी आघाडीवर आहेत.

- दतियामधून नरोत्तम मिश्रा, काँग्रेसचे जितू पटवारी राऊळमधून आघाडीवर आहेत.

- विजयपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार बाबू जांडेल आघाडीवर आहेत

- तर काँग्रेसचे रामनिवास रावत आघाडीवर आहेत.

MP Vidhan Sabha Election 2023: भाजप पूर्ण बहुमताने पुन्हा सरकार स्थापन करणार - शिवराज सिंह चौहान

- सध्याचे निकाल पाहता शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट केले आहे.

- आम्ही पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या मार्गावर आहोत

- मला विश्वास आहे की जनतेच्या आशीर्वादाने भाजपचे सरकार स्थापन करणार आहे.

- 'भारत माता की जय, जनता जनार्दन की जय' अशी घोषणा त्यांनी केली आहे.

- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने पुन्हा सरकार स्थापन करणार आहे.

- भाजपच्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन, असं त्यांनी सांगितले.

MP Vidhan Sabha Election 2023: 11 वाजेपर्यंत मी कोणताही कल पाहणार नाही - कमलनाथ

- माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

- 11 वाजेपर्यंत मी कोणताही कल पाहणार नाही, असे त्यांनी सांगितले.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये भाजप 118 , काँग्रेस 95 जागांवर आघाडीवर

- मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.

- मध्य प्रदेशातील 215 जागांवरचा पहिला कल समोर आला आहे.

- भाजप 118 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस 95 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर 2 जागांवर आघाडीवर आहेत.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार पिछाडीवर

- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे टेन्शन वाढले

- मुख्यमंत्री पदाचा उमेदवार पिछाडीवर

- काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे छिंदवाडामधून पिछाडीवर आहेत.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये भाजप ११३, काँग्रेस ९० जागांवर आघाडीवर

- मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे.

- मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा पहिला कल समोर आला आहे.

- मध्य प्रदेशमध्ये २०५ जागांचे निकाल हाती आले आहेत,

- भाजप ११३ जागांवर आघाडीवर आहे.

- काँग्रेस ९० जागांवर आघाडीवर आहे.

- तर अपक्ष २ जागांवर आघाडीवर आहे.

MP Assembly Election 2023: ग्वाल्हेरमध्ये काँग्रेस ४ जागांवर तर भाजप २ जागांवर आघाडीवर

- ग्वाल्हेरमध्ये पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेस चार जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप दोन जागांवर आघाडीवर आहे.

- बेओहारीमध्ये भाजपचे शरद कोल 1570 मतांनी आघाडीवर आहेत.

- उज्जैनमध्ये मोहन यादव पिछाडीवर तर राऊ मधु वर्मा आघाडीवर आहेत.

- सतना आणि मैहर जिल्ह्यातील 7 पैकी 3 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजप चार जागांवर आघाडीवर आहे.

MP Vidhan Sabha Election 2023: मध्य प्रदेशमध्ये भाजप ७२ तर काँग्रेस ७५ जागांवर आघाडीवर

- मध्य प्रदेशमध्ये पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाली आहे.

- मध्य प्रदेशातील 149 जागांवरचा ट्रेंड आला आहे.

- भाजप 72 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस 75 जागांवर आघाडीवर आहे.

- तर इतर 2 जागांवर आघाडीवर आहेत.

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान आणि कमलनाथ आघाडीवर...

- मध्यप्रदेशमध्ये भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान बुधनीमधून आघाडीवर आहेत.

- मध्यप्रदेशमध्ये गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हे दतियामधून पिछाडीवर आहेत.

- तर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे छिंदवाडामधून आघाडीवर आहेत.

MP Assembly Election 2023 : सुरुवातीच्या कलांमध्ये दिग्गज आघाडीवर

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कैलास विजयवर्गीय, काँग्रेसचे कमलनाथ आघाडीवर

MP Assembly Election News : मध्य प्रदेशातील भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई

मध्य प्रदेशातील भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई, 90 जागांचे कल आले समोर, भाजप आणि काँग्रेस 45-45 जागांवर आघाडीवर

MP Assembly Election 2023 Results : मध्य प्रदेशात निकालाआधीच काँग्रेस पक्षाचा जल्लोष सुरू

मध्य प्रदेश विधानसभा निकालाआधीच काँग्रेस पक्षाचा जल्लोष सुरू. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयातही जल्लोष सुरू, कार्यकर्त्यांनी मिठाई मागवली.

Bhopal Congress News : भोपाळमध्ये काँग्रेस प्रदेश पक्ष कार्यालयाबाहेर निकालाआधीच काँग्रेस उमेदवारांचे अभिनंदनाचे बॅनर झळकले. मतमोजणीला ८ वाजता सुरुवात होणार

MP Election Result News : मध्य प्रदेशात ७ खासदारांसह ३ केंद्रीय मंत्र्यांची कसोटी

नरेंद्र सिंह तोमर (केंद्रीय मंत्री), प्रह्लाद पटेल (केंद्रीय मंत्री), फग्गन सिंह कुलस्ते (केंद्रीय मंत्री), राकेश सिंह, उदय प्रताप सिंह, रीति पाठक, गणेश सिंह

मध्यप्रदेशात भाजपला मोठा धक्का बसणार? तीन एक्झिट पोलमध्ये काँग्रेसच्या बाजूने

Madhya Pradesh Assembly Election 2023 Result Live Updates: मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण याठिकाणी तीन एक्झिटपोलमध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसत आहे. काँग्रेसला बहुमत मिळेल असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, मध्यप्रदेशातील २३० विधानसभा जागांपैकी काँग्रेसला १११ ते १२१ आणि भाजपला १०६ ते ११६ जागा मिळतील.  (Madhya Pradesh Assembly Election 2023 Results)

भाजप की काँग्रेस मध्यप्रदेशात कोण मारणार बाजी? निकालाकडे लक्ष

Madhya Pradesh Assembly Election 2023 Result Live Updates: मध्य प्रदेश विधानसभा २०२३ निवडणुकीचे निकाल आज म्हणजे रविवारी लागणार आहे. यासाठी सकाळी ७ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपसह काँग्रेसने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

भाजपने शिवराज सिंह तर काँग्रेसने कमलनाथ यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवली आहे. मध्य प्रदेशात एकूण २५३३ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात विधानसभेच्या २३० जागा असून यासाठी १७ नोव्हेंबर पहिल्यांदा विक्रमी ७७.१५ टक्के मतदान झालं आहे. तर यावेळी ७८.२१ टक्के पुरुष आणि ७६.०३ महिलांनी मतदान केलं.

विशेष बाब म्हणजे, २०१८ साली मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला १०९ जागा तर काँग्रेसला ११४ जागा आल्या होत्या. बसपाला दोन तर सपा आणि अपक्षाला एक जागा मिळाली होती. २०१८ साली काँग्रेसने १५ वर्षांनंतर मध्य प्रदेशमध्ये सरकारची स्थापना केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT