महाराष्ट्रातला सर्वात मोठा ऑनलाइन शैक्षणिक मार्गदर्शन मेळावा; नोंदणी सुरु Saam Tv
ब्लॉग

महाराष्ट्रातला सर्वात मोठा ऑनलाइन शैक्षणिक मार्गदर्शन मेळावा; नोंदणी सुरु

बारावीनंतर करिअर ओरिएंटेड शॉर्ट टर्म कोर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी सकाळ माध्यम समुहाने निर्माण केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ सर्व काही ठप्प झालं आहे. याचा शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. शाळा ऑनलाइन सुरु असून यंदा दहावी, बारावीच्या परीक्षासुद्धा रद्द झाल्या. आता निकाल लागल्यानंतर पुढे प्रवेश कुठे घ्यायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांसमोर आहे. अशा परिस्थितीत काय करायचं? कुठे प्रवेश घ्यायचा? असे अनेक प्रश्न पालकांना पडले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सकाळ माध्यम समुह मदत करणार आहे.

हे देखील पहा-

सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा ऑनलाइन शैक्षणिक मार्गदर्शन मेळावा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची बौद्धिक, नैतिक क्षमता आणि आर्थिक क्षमता बळकट करण्यासाठी मास्टर प्लॅन आहे. याठिकाणी विद्यार्थी आणि पालकांचे सर्व शंकांचे निरसन होईल.

बारावीनंतर करिअर ओरिएंटेड शॉर्ट टर्म कोर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी सकाळ माध्यम समुहाने निर्माण केली आहे. सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 च्या माध्यमातून असंख्य असे करिअर ओरिएंटेड कोर्स उपलब्ध करून देण्यात येतील. यामध्ये लाइव्ह वेबिनारद्वारे विविध कोर्ससाठी सहभागी होता येणार आहे. सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 मधून भारतातील 50 नामवंत आणि अग्रगण्य अशा विद्यापीठांसोबत जोडले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी महाविद्यालयाच्या एज्युकेशन एक्स्पर्टशी थेट संपर्क साधता येईल. तसंच कोर्सेसद्वारे कॉलेजकडून देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तीचा त्वरीत लाभ मिळणार आहे. करीअर घडविणाऱ्या योग्य कोर्ससाठी आजच आपले नाव रजिस्टर करा. यासोबत तुम्हाला स्टॉक मार्केट प्रशिक्षण (हिंदी भाषेत) आणि मुलभूत (बेसिक) स्टॉक मार्केट हे दोन कोर्स विनाशुल्क करता येतील. सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी www.sakalexpo.com वर क्लिक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Temple: गुफेत आहे शिव मंदिर, महाराष्ट्रातील केदारनाथ तुम्ही पाहिलंय का?

IPL 2025 Mega Auction: धोनीचा खास भिडू मुंबईच्या ताफ्यात! या ३ गोलंदाजांवर लागली मोठी बोली

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्र्यांसोबत काही आमदार शपथविधी घेणार?

IPL Mega Auction 2025 Live News: एकाच डावात १० विकेट्स घेणाऱ्या अंशुल कंबोजवर ३.४० कोटींची बोली

Maharashtra Politics : मुख्यमंत्री कोण आणि शपथविधी कधी होणार? नवी तारीख आणि नवी माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT