किरण गोसावी  SaamTvNews
ब्लॉग

फसवणुकीचा गोसावी पॅटर्न !

गोसावी याने यापुर्वी राज्यातल्याच नाही तर परराज्यातल्या देखील अनेक तरुणांची त्याने फसवणुक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- प्राची कुलकर्णी

एनसीबी प्रकरणात किरण गोसावी झळकला आणि त्यानंतर तो पुण्यातल्या फरासखान्यातल्या प्रकरणात फरार असल्याचं लक्षात आलं. पण त्याचं फसवणुकीचं हे पहिलं प्रकरण नाही. यापुर्वी राज्यातल्याच नाही तर परराज्यातल्या देखील अनेक तरुणांची त्याने फसवणुक केली आहे. कार्डीलिया क्रुझ प्रकरणात आर्यन सह किरण गोसावीचा सेल्फी झळकला आणि त्यानंतर तो पुण्यातल्या प्रकरणात फरार असल्याचं समोर आलं.

हे देखील पहा :

हे प्रकरण होतं २०१७ मध्ये दाखल झालेलं फसवणुकीचं. पुण्यातल्या चिन्मय देशमुख या तरुणाला फेसबुक वरुन गोसावीच्या केपीजी ड्रिम्स नावाच्या कंपनीमार्फत नोकरी लावण्याचं आश्वासन देण्यात आलं. आणि त्यानंतर त्याला मलेशीया मध्ये पण नेण्यात आलं. मात्र त्यानंतरच सुरु झालं संशयाचं चक्र. मलेशीया मध्ये पोहोचलेल्या चिन्मयचा किरण गोसावी कडून संपर्क तर होईना. त्याला स्वत: हॅाटेलची व्यवस्था करुन रहायला सांगण्यात आलं.

नोकरीची तर काही चिन्ह दिसेनातच पण त्याला गोसावीचे लोक सतत येउन पासपोर्टची मागणी करु लागले. कसेबसे पैसे गोळा करत चिन्मय तिकिट काढून माघारी आला. फसवणुक झालेला चिन्मय एकटा नाही. त्याच्या सारखंच राज्या परराज्यातल्या अनेक जणांची फसवणुक याच मार्गाने गोसावीने केल्याचा आरोप आहे. यातल्या काही लोकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत। कोणाला तीन लाख रुपये घेत मलेशीया तर कोणाला दीड लाख रुपये घेत मॅारिशस मध्ये नोकरी लावण्याचं आश्वासन देत गोसावीने फसवले आहे.

अर्थात ही फसवणुक फक्त पैशांसाठीच नसल्याचा संशय आता व्यक्त होत आहे. पोलिस मात्र तपासानुसारच पुढील निर्णय घेणार असल्याचं सांगत आहेत. पोलिसांनी फसवणुक झालेल्या लोकांना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. असेगंभीर आरोप असलेला गोसावी चक्क पोलिसांचा पंच म्हणूनच पुढे आला आहे. आता या प्रकरणात गोसावी अडकतो कि सुटतो ते पहावे लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

PM Modi Speech : सरकारी योजनांवरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, VIDEO

SCROLL FOR NEXT