आता शिवसेनेच्या 'या' माजी मंत्र्यांकडून शिवसेने विरोधात रसद पुरविल्याचा आरोप  संदीप नागरे
ब्लॉग

आता शिवसेनेच्या 'या' माजी मंत्र्यांकडून शिवसेने विरोधात रसद पुरविल्याचा आरोप

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारवर अनेक अस्मानी-सुलतानी नैसर्गिक संकटा बरोबर, विरोधकांनी देखील संकटांचा पाऊस पाडला, अनेकदा सरकार मधील मंत्र्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला.

संदीप नागरे

हिंगोली - राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार येऊन आता अडीच वर्षाचा कालावधी उलटत आहे. या कालावधीदरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारवर अनेक अस्मानी-सुलतानी नैसर्गिक संकटा बरोबर, विरोधकांनी देखील संकटांचा पाऊस पाडला, अनेकदा सरकार मधील मंत्र्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र भाजपने हा प्रयोग सरकार पाडण्यासाठी केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच पुणे येथील पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला.

मात्र इतकी सारी कट-कारस्थाने झाली असताना देखील, बाळासाहेबांची शिवसेना राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊन राज्यकारभार व्यवस्थितपने चालवत आहे. मात्र आता याच शिवसेनेला व शिवसैनिकांना राजकारणात धारातीर्थी पाडण्यासाठी शिवसेनेच्याच नेते व माजी मंत्र्यांनी चंग बांधला आहे की काय असा सवाल उपस्थित झाला आहे. त्याला कारण ठरलं ते, शिवसेना नेते रामदास कदम यांच्या नंतर आता शिवसेना नेते जयप्रकाश मुंदडा यांच्यावर करण्यात आलेले गंभीर आरोप. 

शिवसेना नेत्यांवर हा पहिला आरोप नाही या आधी देखील शिवसेनेच्या मंत्र्यांना राजकारणात धारातीर्थी पाडण्याचा प्रयत्न झाला तो राज्याचे माजी पर्यावरण मंत्री व शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या माध्यमातून, रामदास कदम यांनी शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री अनिल परब यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना रसद पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता.

त्या अशयाची ऑडिओ क्लिप देखील सोशल माध्यमात व्हायरल झाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या एका माजी मंत्र्यांनी शिवसेनेचे खासदार आमदार यासह शिवसैनिकांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप दुसरा तिसरा कोणी नव्हे तर शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या सह शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केला आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी सहकार कॅबिनेट मंत्री बाळासाहेबांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवाराच्या विरोधात पैसे वाटप करून, शिवसेनेच्या उमेदवाराला राजकारणात धारातीर्थी पाडण्याचा प्रयत्न केल्याचं खासदार हेमंत पाटील यांचं म्हणणं आहे आणि याची वाचता खासदार महोदयांनी चक्क शिवसैनिकांच्या सार्वजनिक कार्यक्रमातच केली. शिवसेनेचे माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा हे आपल्या कुटुंबासहित मतदारसंघात पैसे वाटप करत शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांची राज्यभर ओळख आहे, हिंगोलीच्या वसमत मतदार संघात जयप्रकाश मुंदडा यांना शिवसेनेने तब्बल सात वेळा विधानसभेची उमेदवारी दिली. शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये ते मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून विराजमान होते, अल्पसंख्याक समाजातील असलेल्या जयप्रकाश मुंदडा यांना चार वेळा वसमत मधील शिवसैनिकांनी विधानसभेत पाठवले, बाळासाहेबांचा कडवट व निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन, वसमत मधील शिवसैनिकांकडून आज पर्यंत त्यांची ओळख सांगितली जात होती, मात्र आता याच जयप्रकाश मुंदडा यांच्यावर शिवसैनिकांच्या विरोधात कटकारस्थान रचण्याचा आरोप करण्यात आला आहे.

खासदार हेमंत पाटील यांच्या आरोपानंतर स्थानिक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी देखील डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी अनेक निवडणुकीमध्ये गद्दारी करत , शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे लवकरच शिवसेनेचे शिष्टमंडळ घेऊन मातोश्रीवर, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन, जयप्रकाश मुंदडा यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या नंतर देखील डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांचं शिवसैनिकांच्या विरोधात काम सुरूच असून जवळाबाजार कृषी उत्पन्न बाजार समिती व, वसमत बाजार समितीमध्ये शिवसेनेची सत्ता असताना देखील , त्या ठिकाणी गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, प्रशासक नेमण्याची मागणी शिवसेना नेते मुंदडा यांनी केली आहे.

त्यामुळे ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांच्या ताकदीच्या जोरावर मुंबई पासून राजधानी दिल्ली पर्यंत भगवा फडकवला,त्याच शिवसैनिकांना शिवसेनेचे नेते धारातीर्थी पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र राज्यभरात दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भगव्या सोबत गद्दारी करणाऱ्या विरोधात लवकरच राज्यभर विशेष मोहीम राबवून त्यांना शिवसेनेतून बाजूला केले. तर पक्षाचे पुढील भविष्य उज्वल ठरेल अन्यथा, विरोधकांन बरोबरच स्वतःच्या पक्षातील नेत्यांच्या कटकारस्थानना मुळे शिवसैनिक अडचणीत येणार, आणि देशात राजकारणाचा केंद्रबिंदू असलेली त्यांची शिवसेना एक दिवस धारातीर्थी पडेल यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT