प्राणी मित्रांसाठी आनंदाची बातमी! आता आपल्याला वाघाचाही सांभाळ करता येणार  Saam Tv
ब्लॉग

प्राणी मित्रांसाठी आनंदाची बातमी! आता आपल्याला वाघाचाही सांभाळ करता येणार

औरंगाबाद महानगरपालिकेची दत्तक योजना; वाघासोबतच आवडत्या प्राण्यांनाही दत्तक घेता येणार

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - तुम्ही कधी वाघाचा सांभाळ केला आहे का? नाही ना! वाघाचा सांभाळ करणं तर सोडा; त्याच्याजवळ जाण्याची आपण हिम्मत देखील करत नाही. पण आता तुम्हाला वाघाचा सांभाळ करता येणार आहे. तुम्ही वाघ सांभाळणार का? असा प्रश्न जर कोणी केला तर तुम्ही घामेघुम व्हाल. ते शक्य असेल का? असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हो, आता तुम्हाला वाघाचा सांभाळ करता येणार आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेने प्राणी दत्तक योजना औरंगाबाद शहरातील नागरिकांना आणि त्यासोबतच राज्यभरातील प्राणीमित्र, संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्यांसाठी आणली आहे. औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील वाघ दत्तक देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत वाघासह संग्रहालयातील इतर प्राणी दत्तक दिले जाणार आहेत.

आपल्या आवडीचा एखादा पाळीव प्राणी सांभाळायचा असेल तर अनेकांना अडचणीमुळे शक्य होत नाही. पण आता ते शक्य आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या या दत्तक योजनेतून आपण प्राणी दत्तक घेऊ शकता. या योजनेत ज्या व्यक्तींनी, संस्थेने किंवा कॉर्पोरेट कंपन्यानी हे प्राणी दत्तक घेतले आहेत, त्यांनी प्राण्यांच्या वर्षभरासाठीच्या देखभालीचा संपूर्ण खर्च करायचा आहे. या योजनेत वाघ, बिबट्या, कोल्हे, माकड, कासव आदी प्राणी दत्तक दिले जाणार आहे. या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात १४ वाघ असून बिबटे, कोल्हे, नीलगाय, सांबर, चितळ, माकड, कासव असे ३२० मोठे प्राणी आहेत. या दत्तक योजनेची मार्गदर्शक तत्वे ठरवण्यात आली आहेत. प्राणी दत्तक योजनेत सहभागी होणाऱ्यांना प्राण्यांचा वर्षभराचा खर्च द्यावा लागणार आहे. प्राणी दत्तक देऊन निधी उभारणे आणि त्याद्वारे प्राण्यांना अधिक चांगल्या सोयी सुविधा पुरवणे, हा यामागील हेतू आहे.

हे देखील पहा -

ज्या व्यक्ती, संस्था किंवा कंपनीने प्राण्यांना दत्तक घेतले आहे, त्याच्या पिंजऱ्यावर जाहिरात फलक लावण्यात येणार आहे. त्यावर प्राण्यांचे नाव फोटो, व्यक्ती, संस्था, कंपनीचे नाव, फोटोची जाहिरात करता येणार आहे.

प्राण्यांना घरी घेऊन जाता येणार नाही, शिवाय पिंजऱ्याजवळ जाऊन प्राण्यांना त्रास होईल असे वर्तन करता येणार नाही. प्राण्यांना स्पर्श करता येणार नाही किंवा बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ घालता येणार नाही असे नियम करण्यात आले आहेत.

दत्तक घेतलेल्या प्राण्यांचे फोटो, त्या कालावधीसाठी त्यांना ब्रँड म्हणून वस्तू उत्पादनावर वापरता येऊ शकणार आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यक्ती, संस्था, गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यवहारात अडकलेले बदनाम व्यक्ती, संस्था, मादक पदार्थाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्राणी दत्तक दिले जाणार नाहीत किंवा त्यांच्याकडून कुठल्याही स्वरुपात आर्थिक मदत स्वीकारण्यात येणार नाही.

प्राणी दत्तक घेतल्यानंतर करावयाच्या खर्चामध्ये प्राण्यांचे पिंजरे दुरुस्ती व नूतनीकरण, प्राण्यांच्या पिंजऱ्याजवळ कृत्रिम तलाव, धबधबे, कृत्रिम गार्डन तयार करणे, शोभिवंत झाडे, गार्डनिंग, लँडस्केप डिझायनिंग, हिरवळीसाठी स्प्रिंकलर या सुविधांवर खर्च करण्यात येणार आहे.

त्यामुळे तुमच्या व्यस्त कामांमध्ये तुमचा आवडीचा प्राणी सांभाळायला जमत नसेल तर तुम्ही औरंगाबाद महानगरपालिकेच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहात जाऊन एकदा भेट द्या, तिथं तुमच्या आवडीनुसार प्राणी दत्तक घेता येईल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. प्राणी दत्तक घेण्यासाठी अर्ज प्राणी संग्रहात व मनपाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दत्तक देण्यात येणाऱ्या प्राण्यांचा बायोडाटा फोटोज प्राणी दत्तक घ्यायचे असल्यास प्राण्यांच्या सुविधेसाठी खर्च करायची रक्कम याचा तपशील व प्राणी दत्तक घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज मनपा प्राणिसंग्रहालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT