बातम्या

मराठा आरक्षण मागणीसाठी राज्यात आणखी एक बळी..

सकाळ न्यूज नेटवर्क

बीड : मराठा आरक्षण मागणीचा जिल्ह्यात आणखी एक बळी गेलाय. अभिजित देशमुख या पस्तीस वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केलीये.

विज्ञानातून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेला अभिजित देशमुख नोकरी नसल्याने अस्वस्थ होता. त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांवर बँकेचे कर्जही थकीत होते. आरक्षण न दिल्याने नोकरी नाही आणि व्यवसाय करण्यासाठी बँकेचे कर्जही मिळत नसल्याचे तो मित्रांशी बोलत होता. दरम्यान, सध्या आरक्षण मागणीच्या विविध आंदोलनात त्याने सक्रिय सहभाग घेतला. आरक्षण मागणीसाठी सहा बळी गेल्यानंतर "मी देखील या लढाईतील शिपाई असून बलिदान देणार" असल्याचे त्याने सोमवारी रात्रीही बोलून दाखविले होते असे डॉ. धनराज पवार यांनी सांगितले.

अभिजित देशमुख याने मंगळवारी सकाळी घराजवळील एक झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्याच्या खिशात चिट्ठी सापडली असून त्यात मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज आणि औषधी खर्च या कारणाने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. केज पोलीस ठाण्याचे जमादार ढाकणे यांनी पंचनामा लेला असून त्यातही तसा उल्लेख आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

Maharashtra Tourism: सूर्य आग ओकतोय! उष्णतेच्या झळा थंड हवेच्या ठिकाणांनाही, पर्यटकांनी फिरवली पाठ

Narendra Modi Exclusive : अभिजित पवार यांनी PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; देशभरासह महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

SCROLL FOR NEXT