बातम्या

राजेंचे 'एप्रिल फुल' तर होणार नाही ना?

सरकारनामा

सातारा : लोकसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उदयनराजे भोसले यांना पुन्हा खासदार करून मंत्रीपद देण्याबाबत भाजप नेतृत्व आग्रही आहे. त्यानुसार येत्या तीन एप्रिलला राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत आहेत. यापैकी एका जागेवर उदयनराजेंना घेतले जाणार आहे.  

सातारा लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी तीन महिन्यांतच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. मतदारसंघाच्या विकासाचे कारण सांगून त्यांनी पक्ष बदलला. मात्र पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. उदयनराजे पोटनिवडणुकीत अडचणीत होते, हे सर्वजण जाणून होते. तरीही त्यांच्या समर्थकांच्या अट्टाहसापायी त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला पण उदयनराजे खासदार होऊ शकले नाहीत. ही लोकसभा निवडणुकीतील भरपाई करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून उदयनराजेंना सन्मानाने राज्यसभेवर घेऊन  केंद्रात मंत्रीपद देण्याची भुमिका तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडूनही होकार मिळाला आहे. पण राज्यसभेच्या जागा रिक्त होईपर्यंत राजेंना थांबावे लागणार आहे. तीन एप्रिलमध्ये राज्यसभेच्या सात जागा रिक्त होतील. त्यावेळी उदयनराजेंना राज्यसभेवर घेतले जाईल. त्यानंतर केंद्रातील मंत्रीपद दिले जाणार आहे. यासाठी खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्यामुळे उदयनराजेंना तीन एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

एप्रिल महिन्यातील एखाद्याला आश्‍वासन मिळाले की सर्वांची बोटे तोंडात जातात. कारण एप्रिल फुल होऊ शकते. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनाही एप्रिल महिन्याचेच आश्‍वासन भाजपकडून मिळालेले आहे. त्यामुळे त्यांचा एप्रिल फुल होणार की वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. 
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : केसांना गरम तेल लावल्याने काय होते? जाणून घ्या योग्य पध्दत

Face Care: चेहरा नॅचरल ग्लोईंग आणि सॉफ्ट पाहिजे? फक्त आठवड्यातून २ वेळा 'ही' घरच्या घरी तयार होणारी पेस्ट नक्की

Maharashtra Live News Update : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातील पारा चाळीशीपार

Breast Cancer: भारतात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा वाढता धोका; २०५० पर्यंत परिस्थिती गंभीर होणार, लॅन्सेटचा इशारा

Nashik : नाशिकमध्ये सव्वा कोटींची लाच मागणाऱ्या जीएसटी अधिकाऱ्यांच बिंग फुटलं, २० लाख घेताना रंगे हाथ पकडलं

SCROLL FOR NEXT