गव्हाच्या पिठातील भेसळ कशी ओळखाल; या सोप्या ट्रिक्सनं माती खाण्यापासून वाचा

Bharat Jadhav

पिठात मिसळली जातेय दगडाची पूड

आजकाल गव्हाच्या पिठासह विविध खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पिठात दगडाची पूड किंवा इतर पदार्थ मिसळले जात असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

पिठातील भेसळ ओळखू शकता

अशा भेसळीमुळे लोक आजारी पडत आहेत. मात्र, सर्वच पिठात अशा प्रकारे भेसळ असतेच असे नाही. त्यामुळे, पीठ वापरण्यापूर्वी त्यात भेसळ आहे का, याची खात्री करा. या लेखात दिलेल्या टिप्सच्या मदतीने तुम्ही पिठातील भेसळ ओळखू शकता

आरोग्याला धोका

पिठात विविध प्रकारे भेसळ केली जाऊ शकते, परंतु सर्वात सामान्य पद्धतीत दगडाची पूड मिसळली जाते. यासाठी दगडाची बारीक पूड वापरली जाते. ही पूड खाद्यपदार्थांमध्ये मिसळली जाते, ज्यामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो.

पिठातील भेसळ कशी ओळखाल ?

चांगल्या दर्जाचे गव्हाचे पीठ साधारणपणे फिकट तपकिरी किंवा क्रीम रंगाचे असते. जर पीठ अतिशय पांढरे किंवा चमकदार दिसत असेल, किंवा त्याचा पोत असामान्य वाटत असेल, तर सावध व्हावा. फक्त रंग पाहून पिठात भेसळ असल्याचं म्हणू नका. अनेकवेळा चांगल्या प्रतीच्या गव्हाचे पीठ तयार केले तर त्याच्या रंगातही फरक जाणवत असतो.

पिठाची पाण्यात करा चाचणी

एका ग्लासात पाणी घ्या त्यात पीठ टाका. पाण्यात पीठ मिसळू नका. तेच राहू द्या. त्यातील बारीक वाळू सारखे कण ग्लासाच्या तळाशी जमा झाले असतील तर पिठात भेसळ असू शकते.

पॅकेज्ड पीठ खरेदी करताना काय तपासावे?

नेहमी एखाद्या विश्वासार्ह दुकानातून किंवा ब्रँडचेच पीठ खरेदी करा आणि पॅकेटचे सील व पॅकेजिंग नीट तपासून घ्या.पॅकेटवर FSSAI परवाना क्रमांक, बॅच क्रमांक आणि पॅकिंगची तारीख असल्याची खात्री करा. तसेच, पॅकेट फुगलेले, फाटलेले किंवा खराब झालेले नाही ना, याचीही खात्री करा.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Relationship: लग्नानंतर तुमच्यावरील प्रेम कमी झालं? नेहमी बोला फक्त 'ही' गोष्ट; नवरा दररोज घेईल मिठीत