टक्केवारी आणि पर्सेंटाइलमधील फरक समजून घ्या

Bharat Jadhav

गैरसमज आजही कायम

दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा देतात. मात्र, टक्केवारी (Percentage) आणि पर्सेंटाइल (Percentile) या दोन संकल्पना एकाच समजण्याचा गैरसमज आजही कायम आहे.

सोप्या भाषेत समजून घ्या

टक्केवारी म्हणजे विद्यार्थ्याने एकूण गुणांपैकी किती गुण मिळवले याचे मोजमाप. तर पर्सेंटाइल हे त्या विद्यार्थ्याची परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांच्या तुलनेत असलेली कामगिरी होय. म्हणजेच, ते केवळ गुण नव्हे तर इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेतील क्रमवारी दर्शवते.

कुटुंबीयांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम

१२वीच्या गुणांच्या तुलनेत CET परीक्षेत अत्यंत उच्च पर्सेंटाइल मिळवलेल्या सुमारे १,२०० विद्यार्थ्यांबाबत निर्माण झालेल्या वादामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. पण कोणतेही ठोस पुरावे नसताना अशा विद्यार्थ्यांची माहिती सार्वजनिक करणे आणि त्यांच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त करणे, हे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते.

मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम

शिक्षणतज्ज्ञ डॉ. ज्योती मोघे म्हणाल्या, प्रसिद्ध परीक्षा संस्थेची प्रतिमा मलिन करणे सोपे असते. मात्र, कोणतेही ठोस पुरावे नसताना केलेल्या आरोपांचा प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो

वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी परीक्षा

कोटा, दिल्ली, नागपूर, पुणे आणि इतर शहरांतील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देणाऱ्या नामांकित संस्थांचे अस्तित्वच हे सिद्ध करते की, बोर्ड परीक्षा आणि प्रवेश परीक्षा या वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी घेतल्या जातात.

तर गरज राहिली नसती

दोन्ही परीक्षांमधून एकाच प्रकारच्या क्षमतांचे मूल्यमापन होत असते, तर अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षांची गरजच भासली नसती.

आरोपांमुळे होतो भावनिक आघात

सार्वजनिक क्षेत्रातील प्रत्येक आरोपाचे दूरगामी परिणाम होत असतात. त्यामुळे सार्वजनिक चर्चेत जबाबदारी आणि संयम आवश्यक आहे."