Train Accident Saam Tv
बातम्या

Reels Video: रील्सच्या नादात आयुष्य संपलं; रेल्वे ट्रॅकवर शूट करताना तिघांचा मृत्यू

अचानक भरधाव वेगात आलेल्या ट्रेनने तिघांनाही धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

साम टिव्ही ब्युरो

गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये रेल्वे ट्रॅकवर रील बनवणाऱ्या तीन जणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गाझियाबादमध्ये एक तरुणी आणि दोन तरुण रेल्वे रुळावर रील शूट करत असताना हा अपघात झाला. अचानक भरधाव वेगात आलेल्या ट्रेनने तिघांनाही धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

मसुरी पोलीस स्टेशन हद्दीतील कल्लू गढी रेल्वे गेटजवळ रेल्वे रुळावर उभे राहून रील बनवत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक मुलगी आणि दोन तरुण कल्लू गढी रेल्वे ट्रॅकवर रील बनवत होते, तेव्हा तिघांना पद्मावत एक्सप्रेस ट्रेनने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

घटनेची माहिती प्रवाशांनी स्थानिक पोलिसांना दिली. माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपासात तिघेही रेल्वे रुळावर रील बनवत असल्याचे निष्पन्न झाले. (Railway Accident)

गाझियाबाद ग्रामीणचे डीसीपी यांनी सांगितलं की, रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मसुरी येथे एका रेल्वे स्टेशन मास्टरला माहिती मिळाली की तेथे 3 लोकांना ट्रेनने धडक दिली आहे. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आम्हाला 3 मृतदेह आढळले. मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

आम्हाला रेल्वेकडून माहिती मिळाली की हे तिघे तिथे व्हिडिओ बनवत होते. मात्र ट्रेन येत असल्याचा अंदाज या तिघांनाही आला नाही. त्यामुळे ट्रेनच्या धडकेनंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटली असून, याप्रकरणी आवश्यक ती कारवाई केली जाईल, असं डीसीपींनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Glowing Skin Tips: फ्रिजमधील या ४ गोष्टींनी परत मिळवा त्वचेचा हरवलेला ग्लो; जाणून घ्या ७ सोपे उपाय

काळजाचा थरकाप! जेजुरीत खेळता खेळता दीड वर्षाच्या चिमुकला अचानक गायब झाला, सगळीकडे शोधाशोध, सेफ्टी टँककडे नजर जाताच पालकांना...

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये ठाकरे सेनेचे रामरक्षा आंदोलन

KDMC डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द; पोलिसांसमोर सरेंडर होणार

World's first website: इंटरनेटवरील सर्वात पहिली वेबसाईट कोणती होती?

SCROLL FOR NEXT