corporation
corporation 
बातम्या

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून बालरोग तज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण

वैदेही काणेकर

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका Mumbai Municipal Corporation क्षेत्रात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आणि औषधोपचार Medication विषयक बाबींची अंमलबजावणी चांगल्याप्रकारे करण्यात येत आहे. मुंबईकर Mumbai नागरिकांनी देखील महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी करण्यात आलेल्या आवाहनांना उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे कोविडच्या दुसऱ्या लाटे दरम्यान उत्तम व्यवस्थापन करणे महानगरपालिका प्रशासनाला शक्य झाले आहे.

तथापि, आता कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांद्वारे वर्तविली जात आहे. या तिसऱ्या लाटे दरम्यान लहान मुलांना व झोपडपट्टी परिसरांमधील रहिवाश्यांना संसर्गाची अधिक शक्यता असल्याचे तज्ज्ञांद्वारे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने सुसज्ज व सतर्क राहण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. 

हे देखील पहा -

या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांनी सर्व परिमंडळ उपायुक्‍त, सर्व २४ प्रशासकीय विभागांचे सहाय्यक आयुक्त आणि आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी यांना कार्यवाही व अंमलबजावणीबाबत खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत:-

१. महानगरपालिकेच्या सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रातील बालरोग तज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण देण्याच्या‌ दृष्टीने कार्यवाही करावी व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करावे. हे प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्ष पद्धतीने आयोजित करावेत. तथापि, सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन तुकड्यांमध्ये (बॅचेस) करण्यात यावे.  

२. अशा प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील संबंधित विभागातील ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील. यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्याची जबाबदारी महानगरपालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

३. त्याचबरोबर 'पेडियाट्रिक टास्क फोर्स' मधील सदस्यांनाही मार्गदर्शक म्हणून या प्रशिक्षण कार्यक्रमांना निमंत्रित करण्यात यावे.

४. या व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या सर्व 'हेल्थ पोस्ट' च्या स्तरावर गृहभेटी वाढविण्यात याव्यात.

५. तसेच सर्व झोपडपट्टी परिसर, सार्वजनिक शौचालये आणि सार्वजनिक सुविधा इत्यादींच्या ठिकाणी अधिक प्रभावी स्वच्छता राखण्यात यावी.

६. या सर्व बाबतीत संनियंत्रण व पुनर्विलोकन हे परिमंडळ उपायुक्तांच्या स्तरावर करण्यात यावे. 

७. या सर्व बाबींसंदर्भात प्रशासकीय विभागांच्या स्तरावर कृती आराखडा तयार करून तो कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात यावा. 

उपरोक्त नमूद निर्देशानुसार सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी  त्वरित कार्यवाही सुरु केली आहे. या प्रशिक्षण उपक्रमाच्या अंमलबजावणीस तात्काळ चालना देण्याची सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त काकाणी यांनी केली आहे. कोविडच्या संभाव्य तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सर्व उपाययोजनांसह सुसज्ज झाली आहे.   

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, किमतींवर नकारात्मक परिणाम; कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

SCROLL FOR NEXT