Chetna sinha
Chetna sinha  
बातम्या

दुष्काळी भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी झटणारी 'ती' रणरागिणी...

संजय महाजन

सातारा - सातारा जिल्ह्यातील पूर्व भाग म्हणजे कायम दुष्काळग्रस्त Draught भाग Area म्हणून ओळख असणाऱ्या या भागात मूलभूत सोयीसुविधांची वानवा असताना आरोग्यसेवा हि देखील एक दुर्लक्षित बाब आहे. She strives for the health of the citizens in the drought stricken areas 

सातारा Satara जिल्ह्यात जसा जसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला, त्यावेळी रुग्णांना बेड मिळण्यासाठी सातारच्या रुग्णालयाचे रस्ते धरावे लागत होते. अश्या सर्व परिस्थितीत स्थानिक नागरिकांच्या आरोग्य प्रश्नासाठी माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांचे काम खरोखर कौतुकास्पद आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटे पासून दुष्काळी माण तालुक्यातील कोरोना रुग्णांना माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून चेतना सिन्हा यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. She strives for the health of the citizens in the drought stricken areas ...

कोरोनाच्या Corona या कठीण काळात सामाजिकतेचे भान ठेवत चेतना सिन्हा यांच्या माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून परिसरातील ७ कोविड Covid सेंटर मधील ६०० कोरोना रुग्णांना रोज दोन वेळचे मोफत जेवण दिले जात आहे. अगदी उत्तम प्रतीचे पौष्टिक जेवण या रुग्णांना पुरवण्यात येत आहे.

या भागातील बऱ्याच लोकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने महिलांसाठी आणि 18 वर्षाच्या खालील लहान मुलामुलींची मोफत HRCT तपासणी या फाऊंडेशन च्या माध्यमातून केली जाते. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला परंतु माणदेशीच्या Mann Deshi Foundation माध्यमातून या भागात ऑक्सिजन बॅंक ही संकल्पना उभी राहिली. जवळपास  56 कॉन्सन्टेटर मशीनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना जिथे गरज असेल तेथे मोफत मशीन घरी पोहचवल्या जात असल्याने बरेच रुग्ण होम आयसोलेशन मध्येच बरे झाले.

हे देखील पहा -

या भागात आरोग्यसेवांची वणवण असल्याने रुग्णांना उपचारासाठी सातारा किंवा इतर ठिकाणी घेऊन जायचे असेल तर वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. हीच बाबा ध्यानात घेऊन माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून अद्यावत अशा 2 कार्डियाक रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेस्तव उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

एवढेच नव्हे तर गोंदवले येथे उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय सुसज्ज करण्यासाठी माणदेशी तब्बल 55 लाख रुपयांची मदत केली आहे. सातारा शहरात उभारण्यात आलेल्या जंबो कोव्हिड सेंटर ला आत्ता पर्यंत 28 व्हेंटिलेटर ची मदत करून माणदेशी फाऊंडेशनने प्रशासनाचा बराचसा भार हलका केला आहे.

कोणताही राजकीय किंवा प्रसिद्धीचा हेतू डोळ्यासमोर न ठेवता माणदेशी जनतेसाठी चेतना सिन्हा Chetna Sinha या रणरागिणीने उभ्या केलेल्या या चळवळीवर आता विविध स्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: वाढलेला आकडा आला कुठून? मतदानाच्या टक्केवारीवरून संजय राऊतांचा गंभीर आरोप

IPL 2024 Points Table: चेन्नईला नमवत पंजाबची गुणतालिकेत मोठी झेप!या संघांचं टेन्शन वाढलं

Kalyan Shiv Sena News | ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाचा शिंदे गटात जबरदस्तीने प्रवेश?

Pune Crime: बायकोशी वाद.. चिडलेल्या जावयाने सासुच्या दुचाकीसह १५ गाड्या पेटवल्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Prakash Shendge News | सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील वंचित कसे? शेंडगेंचा संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT