new rule for vaccination
new rule for vaccination 
बातम्या

रायगडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा उलट परिणाम: लस घेतल्यावर ९० जणांची तब्येत बिघडली

दिनेश पिसाट

रायगड:  रेमडेसिवीर इंजेक्शनचा Remdesivir Injection डोस घेऊन काही टक्क्यांच्या प्रमाणात लोक बरे होतानाच चित्र आहे. त्यामुळे याची कमतरता देशभरात दिसून येत आहे. परंतु राजगडामध्ये  रेमडेसिवीर इंजेक्शनचा उलटाच परिणाम झालेला दिसून येत आहे. या उलट झालेल्या परिणामांमुळे रायगड जिल्ह्यात हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून वितरीत करण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबवण्यात यावा असे आदेश अन्न औषध प्रशासनाने Food and Drug Administration जारी केले आहेत. Reverse effect of Remdesivir injection in Raigad

कोविफोर नामक इंजेक्शनच्या एचसिएल २१०१३ बॅचचा वापर आणखीन पुढे करण्यात येऊ नये असे निर्देश रायगड जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना जारी करण्यात आले आहेत. कंपनीकडून देण्यात आलेल्या इजेंक्शनचे रुग्णांवर दुषरिणाम  झाल्यांची गंभीर बाब समोर आली आहे.

आधीच जिल्ह्यात तुटवडा जाणवत होता त्यात आता नकली रेमडेसिविरचा पुरवठा झाल्याची धक्कादायक बाब जिल्ह्यात समोर आली आहे. काही रुग्णांना हेटेरो हेल्थकेअर Hetero Healthcare कंपनीची कोविफोर नामक लस दिल्यानंतर शरीरात त्रास जाणवल्याची बाब समोर आली.

या इंजेक्शनच्या ५०० लसी जिल्ह्याला प्राप्त झाल्या होत्या. यापैकी १२० लसी कोरोना रुग्णांना देण्यात आल्या. यातील ९० लोकांनी लस घेतल्यावर त्रास जाणवला. रुग्णांवरील होणारा प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन हेटेरो हेल्थकेअर कंपनीने कोविफोर नावाच्या बँच नंबर एचसिएल २१०१३ इंजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्यात यावा अशी विनंती केली आहे. गुरुवारी एक पत्र याबाबत कंपनीच्या वतीने जारी करण्यात आले. काही तांत्रिक अडचणीमुळे या बॅचमधील सर्व रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबविण्यात यावा असे यात नमुद करण्यात आले. Reverse effect of Remdesivir  injection in Raigad

या बॅचमधील सर्व कोविफोर इंजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याचे आदेश पेण येथील सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन गि. दि. हूकरे यांनी सर्व रुग्णालयांना आणि वितरकांना दिले आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या वृत्ताला पुष्टी केली आहे. या रेमडेसिविर इंजक्शनच्या खराब झालेल्या डोस बाबत राज्यसरकारला कळविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; कोणत्या मार्गावरील सेवा असणार बंद? कोणत्या मार्गावर विशेष सेवा?

Kolhapur News: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल करणारा व्हिडिओ केला व्हायरल, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

Today's Marathi News Live : संभाजीनगर शहरात गॅस सिलिंडरचा स्फोटानंतर लागली आग

Special Report : कोकणात रंगणार ठाकरे विरूद्ध ठाकरे लढाई, सभांचा झंझावात

SCROLL FOR NEXT