बातम्या

नक्की वाचा | ‘अंतिम’ परीक्षासंदर्भात सामंत यांनी काय केला दावा 

साम टीव्ही न्यूज


मुंबई : राज्यात परीक्षा न झाल्यामुळे पदवी मिळालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर ‘कोविडबाधित बॅच’ असा शिक्का येणार नसल्याची ग्वाही सामंत यांनी दिली.शासनाची भूमिका विद्यार्थीहिताची आहे, आणखी २ ते ३ दिवस यूजीसीच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊनही ते उत्तीर्ण होत नसतील तर ग्रेस गुण देऊन एटीकेटी मुक्त करण्यात यावे, अशी शिफारस कुलगुरुंनी केली असून त्यावर सरकार विचार करत असल्याचे सामंत यांनी सांगितले.

विद्यापीठांच्या परीक्षांवरून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागात चांगलीच जुंपली आहे. युजीसीने परीक्षा घेण्याचे फर्मान सोडल्यानंतरही मंत्री सामंत यांची नकारघंटा कायम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा घेणे योग्य नसल्याचे सामंत यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, अंतिम वर्षासह अन्य परीक्षांबाबत कुलगुरू सूचवतील तो निर्णय घेण्याचे मंत्रिमंडळ बैठकीत ठरले होते. त्यानुसार ६ जुलै रोजी कुलगुरुंची बैठक झाली. यात १३ कुलगुरुंनी परीक्षा घेणे योग्य नसल्याचे मत मांडले. त्यानुसार युजीसीला विनंती केली होती. आता कुलगुरुंचे ऐकावे की युजीसीचे? या संभ्रमात आम्ही आहोत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याचा पुनरुच्चार उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केला. तसेच राज्यातील १३ विद्यापीठांच्या कुलगुरुंनी देखील परीक्षा घेण्याबाबत प्रतिकूल मत व्यक्त केल्याचा दावाही सामंत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेटसाठी शेवटचे ८ दिवस, डेडलाइननंतर लागणार ₹१०,००० चा दंड

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही - मनोज जरांगे पाटील

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी, औषधांवर २५० टक्के टॅरिफ, फार्मा क्षेत्राला धक्का

Paan Sharbat Recipe : बाहेरून थकून आल्यावर प्या गारेगार 'पान सरबत', मिनिटांत व्हाल रिफ्रेश

Kajol : "नमस्कार सगळ्यांना..."; पुरस्कार मिळाल्यानंतर काजोलनं 'मराठी' भाषेत व्यक्त केल्या भावना, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT