Rastaroko agitation by BJP at Pusad for crop insurance compensation
Rastaroko agitation by BJP at Pusad for crop insurance compensation 
बातम्या

पीक विमा भरपाई करिता पुसद येथे भाजपा कडून रास्तारोको आंदोलन

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

यवतमाळ: यवतमाळ Yavatmal जिल्ह्यामध्ये  इफको टोकियो कंपनी शेतकऱयांचा पीक विमा काढते . गेल्या काही महिन्यापूर्वी शिवसेनेच्या Shivsena खासदार भावना गवळी Bhavna Gavali यांनी सुद्धा या कंपनी विरोधात आंदोलन केले होते. पण आंदोलनाचा फारसा फायदा झाला नसल्याचे दिसून आले. आता पुसद येथे भाजपाच्या BJP शेकडो कार्यकर्त्यांनी पुसदच्या शिवाजी चौकात या विमा कंपनीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. Rastaroko agitation by BJP at Pusad for crop insurance compensation

यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण हंगाम शेतकऱयांच्या हातातून गेला. अवकाळी पावसाने Monsoon पिकांचे अक्षरश मातेरे केले. जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणाने दुष्काळी परिस्थिती जाहीर केली. सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱयांसाठी १०० कोटीचे पॅकेज घोषित केले होते. याचा एकही छदाम जिल्ह्यातील शेतकऱयांना मिळाला नाही. 

यामुळे हमखास पीक विमा मिळेल अशी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र विमा कंपनीने ६१ हजार शेतकरी मदतीस प्राप्त ठरविले. उर्वरित ४ लाख ६० हजार शेतकरी या मदतीस अपात्र ठरविण्यात आले.

हे देखील पहा -

यावेळी सरकार विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली . यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी विमा कंपनीच्या विरोधात पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सरकारने शेतकऱयांना सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली आहे . हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी दिला .

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan News : भाईजान अर्ध्या रात्री लंडनहून मुंबईत परतला; विमानतळावर पापाराझींची नजर चुकवत गाठलं घर

Today's Marathi News Live : धाराशिवमध्ये प्रकाश आंबेडकर यांची आज जाहीर सभा

Bhiwandi Constituency: भिवंडी मतदारसंघात राजकारण तापलं, काॅंग्रेस नेते दयानंद चोरगे उमेदवारी अर्ज दाखल करणार?

Commuters Falls From Train : लोकलगर्दीचे बळी! ५ दिवसांत ३ प्रवाशांचा ट्रेनमधून पडून मृत्यू

Nashik News: हृदयद्रावक! खेळता खेळता तलावात पडले, बहीण भावाचा करुण अंत; नाशिक हळहळलं

SCROLL FOR NEXT