pradip solunke 
बातम्या

मराठवाडयातील मराठ्यांचं ओबीसीकरण हा एकच आमचा उद्देश- प्रदीप सोळुंके

MRUNALINI NANIWADEKAR

मराठे कधी एका झेंड्याखाली एकत्र आले नाहीत आणि ते एकत्रही येणं शक्य नाही, आम्ही हैद्राबाद स्टेटमधून आलेलो असल्यामुळे ओबीसी (OBC) हा आमचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही ओबीसी असल्याचे पुरावे मिळण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) सत्यशोधक समिती स्थापन करून पुरावे गोळा करावेत अशी मागणी मराठवाडा मराठा आरक्षण (Maratha Reservation) संघर्ष समितीचे मुख्य संयोजक प्रदीप सोळुंके यांनी केली आहे. आज सोळुंके यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.

मराठवाडयातील मराठ्यांचं ओबीसीकरण हा आमचा एकच उद्देश असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे किंवा संसदेत बिल मंजूर करून आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण देणे या दोनच मार्गातून मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मिळू शकते. असंही सोळुंके यांनी म्हटलं आहे.(Pradip Solunke has demanded that the Maratha community be included in OBC)

हे देखील पाहा

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणावरून तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. काल मराठा आरक्षावरून बीडमध्ये शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले गेले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात येत्या १६ तारखेपासून खासदार छत्रपती संभाजी राजे आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. त्यांच्या या आंदोलनाला छत्रपती उदयन राजे यांनीही पाठिंबा दिलेला आहे.

एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी होत असताना मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या या मागणीवरून ओबीसी आणि मराठा वाद पुन्हा उभा राहण्याची शक्यता आहे.   

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT