petrol  
बातम्या

पेट्रोल दर १५० रुपये गाठणार ?

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

यवतमाळ : १०० रुपयांमध्ये एक लिटर पेट्रोल देखील मिळत नसल्याची महागडी वेळ सर्वसामान्यांच्या जीवनात आली आहे. याला महागाईचा परमोच्च बिंदूच मानावे लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे दर कमी झाले आणि जास्त झाले तरीही सामान्यांना त्याबद्दल कोणतेही सोईरसुतक असल्याचे दिसत नाही. Petrol price to reach Rs 150?

मात्र वाढती महागाई आणि त्याच तुलनेत घटलेले उत्पन्न यांचा सामना करताना सामान्य नागरिकांची मात्र निश्चित दमछाक होत आहे. इंधनाचे दर वाढले कि महागाई वाढणार हे साधे गणित आहे. मात्र सद्यस्थितीत पेट्रोलचे दर काही कमी होण्याचे चिन्ह नाही.

पेट्रोल डिझेलचे दर वाढताना रुपयांमध्ये वाढतात आणि कमी होताना मात्र एक दोन पैशांनी कमी होतात. त्यामुळे जोपर्यंत विधानसभा लोकसभा निवडणूक येत नाहीत तोपर्यंत राज्य आणि केंद्र सरकार इंधन Fuel दरवाढ या प्रश्नाला गांभीर्याने घेणार आहे कि नाही असा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण होऊ लागला आहे. 

वाढत्या महागाई सोबतच पेट्रोल Petrol आणि डिझेलच्या Diesel भावात Price सातत्याने वाढ Incresse होताना दिसत आहे. सध्या यवतमाळ Yavatmal येथे पेट्रोलचा दर हा १०३.३० रुपये डिझेलचा दर हा ९३.९४ रुपये इतका आहे. त्यामुळेच पेट्रोलचे दर हे काय १५० रुपये गाठणार का असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.

हे देखील पहा -

पेट्रोल आणि डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. आज पेट्रोलचे दर हे २८ पैशानी तर डिझेलचे दर हे २९ पैशानी महागले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात रोज सकाळी ६ वाजता बदल होत असतो. आणि सकाळी ६ वाजताच नवे दर लागू होत असतात.

परकीय चलन दरासह आंतरराष्टीय बाजारात कच्या तेलाच्या किमती काय आहे यानुसार रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होतो. रोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे मात्र सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. Petrol price to reach Rs 150?

सध्या शेतीची कामे चालू आहेत. मजुरी परवडणारी नसल्याने शेतकरी सर्व कामे यांत्रिकी पद्धतीने करतात. जेव्हा वीज नसते तेव्हा उन्हाळी पिकांना डिझेलच्या पंपाने शेतीत पाणी टाकले जाते. अशातच डिझेलचे भाव सातत्याने वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. अशा स्थितीत केंद्र शासनाने Central Government पेट्रोल, डिझेलची ज्या पद्धतीने दरवाढ सुरु ठेवली आहे ही क्रूर थट्टाच म्हणावी लागेल.

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

SCROLL FOR NEXT