बातम्या

Petrol-diesel price hike | पेट्रोल डिझेलच्य़ा किंमती पुन्हा वाढल्या, वाचता कसे असतील नवे दर?

साम टीव्ही

देशातील इंधनाच्या दरात आठवड्याभरामध्ये तिसऱ्यांदा वाढ करण्यात आलीय.  पेट्रोल आणि डिझेलमध्ये लिटरमागे २५ पैशांनी वाढ झाली असून,  मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचे दर ९२ रुपये 4 पैशांवर पोहोचलेत.  तर डिझेलच्या दराने नवीन उच्चांक गाठला.  आठवड्याभरात तब्बल 75 पैशांनी इंधन दराचा भडका उडालाय. सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या किमतींमुळे सरकारने इंधनावरील अबकारी करामध्ये कपात करण्याची मागणी होतेय.

हेही वाचा 

पाहा यासंबंधीचा सविस्तर व्हिडिओ - 

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार येत्या ३० नोव्हेंबरला ओपेक देशांच्या सदस्यांची बैठक होणार आहे. करोना लस, युरोपात पुन्हा लॉकडाउनची शक्यता आणि उत्पादन कपात यावर या बैठकीत निर्णय होणार आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून ४० डॉलरवर स्थिर असलेला कच्च्या तेलाचा भाव आता ४५ डॉलरच्या आसपास गेला आहे. युरोपात पुन्हा लॉकडाउन केल्याने इंधन मागणीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरोपातील रिफायनरी तात्पुरत्या बंद ठेवण्याचा विचार केला जात आहे.
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Self Reflection : जाता-येता आरशात स्वत:ला बघणारी व्यक्ती नक्की काय विचार करते? काय आहे त्यामागील मानसशास्त्र

७५ जिल्ह्यांत अचानक बत्ती गुल अन् सायरनचा टँव टँव आवाज; राज्यात खळबळ, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: विरोधकांना विदेशातून मोठी आर्थिक ताकद…मंत्री विखे यांचा मोठा आरोप

Zunka Bhakri Recipe: थंडीत रात्री जेवणासाठी करा खमंग स्वादिष्ट झुणका-भाकर, वाचा आजीची खास रेसिपी

'गरीब की बीवी सबकी भाभी...; वादग्रस्त विधानामुळे मनपा महासभेत राडा, ठाकरे गटाच्या नगरसेवकाला सभागृहाबाहेर काढलं!

SCROLL FOR NEXT