jejuri oxygen
jejuri oxygen 
बातम्या

जेजुरीत ऑक्सिजनच्या तुटवड्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक 

मंगेश खरात

बारामती : महाराष्ट्रात आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उपद्रव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुंगांची संख्या वाढतांना दिसून येत आहे.  रुग्णसंख्या वाढताच कोरोना Corona या आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे . Oxygen shortages in Jejuri make Congress workers aggressive

ऑक्सिजनच्या तुटवड्याने जेजुरीत Jejuri काँग्रेस Congress कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत . काँग्रेस कार्यकर्त्यांनी ऑक्सिजनच्या गाड्या Vehical देखील रोखल्या आहेत. जेजुरी एमआयडीसी मध्ये के.चंद्रा इंजिनिअरिंग प्रा लि. या ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपनी असून इथून ऑक्सिजनचा पुरवठा बाहेरगावी केला जात असल्याची माहिती मिळाल्याने जेजुरीचे नगरसेवक अजिंक्य देशमुख Ajankya Deshmukh, सुशील राऊत Sushil Raut यांनी कार्यकर्त्यांसह या कंपनीत जाऊन ऑक्सिजनने भरलेल्या गाड्या रोखल्या.

पुरंदर Purandhar तालुक्यासाठी दररोज 450 ऑक्सिजनच्या टाक्यांची गरज आहे, कंपनी दररोज 800 ऑक्सिजन टाक्यांचे उत्पादन करते. प्रथम 450 टाक्या पुरंदरला प्राधान्याने द्याव्यात नंतरच बाहेर इतरत्र पुरवाव्यात असा आग्रह धरला, अन्यथा येथून एकही ऑक्सिजनची टाकी बाहेर जाऊ दिली जाणार नाही असा पवित्रा घेत कंपनीत ठिय्या मांडला.  शेवटी कंपनी व्यवस्थापणाने त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत पहाटे तीन वाजेपर्यंत पुरंदरच्या ऑक्सिजन टाक्यांची पूर्तता केली. शिवाय पुरंदरच्या मागणीला प्रथम प्राधान्य देऊ असे आश्वासन कंपनीचे जनरल मॅनेजर योगेंद्र चौधरी  Yogendra Chaudhari यांनी दिले. Oxygen shortages in Jejuri make Congress workers aggressive

Edited By - Shivani Tichkule
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Health: घामोळ्या, पुरळसारख्या समस्यांवर रामबाण उपाय; त्वाचेच्या सर्व समस्या होतील गायब

Kshitij Zarapkar : अभिनेते क्षितीज झारापकर यांचं कर्करोगाने निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

ICC Champions Trophy: 'टीम इंडियाला पाकिस्तानात यावंच लागेल, अन्यथा...' माजी पाकिस्तानी खेळाडूची वॉर्निंग

Kalyan Crime News: तहान लागल्याने पाणी प्यायला गेली, नराधमानं संधी साधली; कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

India's Smallest Village: भारतातील सर्वात लहान गाव तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT